घरCORONA UPDATEभारतात ८० लाखांपेक्षा अधिक रुग्ण झाले कोरोनामुक्त

भारतात ८० लाखांपेक्षा अधिक रुग्ण झाले कोरोनामुक्त

Subscribe

भारतातील सक्रिय रूग्णांची संख्या १०६ दिवसांत प्रथमच ५ लाखांहून कमी झाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आज ४ लाख ९४ हजार ६५७ इतकी आहे.

जागतिक महामारीशी लढा एकत्रितपणे देताना भारताने अनेक मैलाचे दगड पार केले. भारतातील सक्रिय रूग्णांची संख्या १०६ दिवसांत प्रथमच ५ लाखांहून कमी झाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आज ४ लाख ९४ हजार ६५७ इतकी आहे. २८ जुलैला ही संख्या ४ लाख ९६ हजार ९८८ होती. उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण कोविडबाधितांच्या संख्येच्या ५.७३टक्के आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णसंख्येतील घसरणीतील सातत्य कायम आहे. जगातील अनेक देशांमध्ये नवीन रुग्णसंख्येचा आकडा वाढत असताना भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट महत्त्वपूर्ण आहे. केंद्रसरकारच्या शाश्वत, वर्गीकृत आणि अचूक धोरणे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेली परिणामकारक अंमलबजावणी, वैद्यकीय व्यावसायिक तसेच कोविड १९ योद्धयांनी दिलेली सेवा यामुळेच हे शक्य झाले आहे.

- Advertisement -

२७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या २० हजारांपेक्षा कमी आहे. फक्त ८ राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपचार घेत असलेली रुग्णसंख्या २० हजारांपेक्षा जास्त आहे; फक्त केरळ आणि महाराष्ट्रामध्ये सक्रिय रुग्णसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे. २४ तासात ४४ हजार २८१ नवे रुग्ण नोंदवले गेले, तर ५० हजार ३२६ जणांवर उपचार सुरू आहेत.

सलग ३९ व्या दिवशी बरे होणार्‍यांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे.म्हणजे बरे होणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत आहे. रोगमुक्त आणि उपचाराधीन यांच्या संख्येतील तफावतही वाढत आहे. रोगमुक्तांच्या संख्येच्या आकड्याने ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आजमितीस रोगमुक्तांची संख्या ८० लाख १३ हजार ७८३ आहे. रोगमुक्त आणि उपचाराधीन यांच्या संख्येतील तफावत ७५ लाख १९ हजार १२६ एवढी जास्त आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर ९२.७९ टक्के आहे.

- Advertisement -

चाचण्यांनी १२ कोटींचा टप्पा ओलांडला

देशात गेल्या २४ तासात ११ लाख ५३ हजार २९४ निदान चाचण्या करण्यात आल्या. बाधितांच्या दैनंदिन संख्येत घट येण्याचे कारण म्हणजे निदान चाचण्यांची वाढवलेली संख्या होय. मोठ्या प्रमाणावरील निदान चाचण्यांमुळे लोकसंख्येतील बाधितांचे प्रमाण लक्षात येते. त्यामुळे बाधित नसलेल्यांना संसर्ग न होऊ देण्याची खबरदारी घेता येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -