घरदेश-विदेशकेंद्र सरकारी नोकर्‍यांमध्ये ९.७९ लाखांहून जास्त पदे रिक्त

केंद्र सरकारी नोकर्‍यांमध्ये ९.७९ लाखांहून जास्त पदे रिक्त

Subscribe

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांतर्गत येणार्‍या विभागांमध्ये ९.७९ लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. यापैकी सर्वाधिक पदे भारतीय रेल्वेत रिक्त आहेत. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार १ मार्च २०२१ पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ९.७९ लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यापैकी भारतीय रेल्वेमध्ये सर्वाधिक २.९३ लाख पदे रिक्त आहेत. केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांच्या आवश्यकतेनुसार रिक्त पदांवर सहभागींच्या नियुक्त्या केल्या जातील. विविध रिक्त पदांवर कर्मचार्‍यांची भरती विहित प्रक्रियेनुसारच केली जाईल.

- Advertisement -

सरकारने सर्व मंत्रालये, विभागांना वेळेवर रिक्त पदे भरण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत. भारत सरकारद्वारे आयोजित करण्यात येणारे रोजगार मेळावे पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करतील अशी अपेक्षा आहे, असे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तरात सांगितले.

कोणत्या विभागात किती पदे रिक्त
रेल्वे विभागाव्यतिरिक्त संरक्षणमध्ये (सिव्हिल) २.६४ लाख पदे रिक्त
गृह मंत्रालयात १.४३ लाख पदे रिक्त
महसूल विभागात ८०,२४३ पदे रिक्त
भारतीय लेखा विभागात २५,९३४ पदे रिक्त
अणुऊर्जा विभागात ९,४६० पदे रिक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -