Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश केरळमध्ये कोरोनाचं थैमान! दिवसभरात ३० हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद १८१ रुग्णांचा...

केरळमध्ये कोरोनाचं थैमान! दिवसभरात ३० हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद १८१ रुग्णांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवार देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार ८७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलेली आहे. तर ३६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३९ हजार ११४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढून ३ कोटी २२ लाख ६४ हजार ५१ वर पोहोचली आहे. देशात कोरोनाचा कहर गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून पु्न्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. केरळ राज्यात देखील कोरोनाचं थैमान पुन्हा पाहायला मिळत असून केरळमध्ये बुधवारी कोरोनाचे ३० हजार १९६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या नव्या रूग्णांमुळे, कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची एकूण संख्या ४२ लाख ८३ हजार ४९४ झाली आहे. यासह दिवसभरात १८१ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या २२ हजारांवर पोहोचली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

केरळ राज्यात सलग पाच दिवस दररोज ३० हजाराच्या खाली रूग्ण संख्या झाल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा ३० हजाराचा आकडा पार कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये संक्रमणाचा दर वाढून तो १७.६३ टक्के झाला असून गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या १ लाख ७१ हजार २९५ जणांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. केरळमध्ये कोरोना संक्रमणाचा दर १६ टक्क्यांवर होता, जो बुधवारी वाढून १७.६३ टक्के झाला. गेल्या दिवसभरात राज्यातील कोरोनाचे २७ हजार ५७९ रुग्ण देखील कोरोनामुक्त झाले, ज्यामुळे राज्यात या विषाणूच्या संसर्गावर मात करणाऱ्या लोकांची संख्या वाढून ४० लाख २१ हजार ४५६ झाली आहे. तर सध्या केरळ राज्यात २ लाख ३९ हजार ४८० रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या आकडेवारीनुसार, त्रिशूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक ३ हजार ८३२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यानंतर एर्नाकुलममध्ये ३ हजार ६११, कोझिकोड ३ हजार ५८, तिरुअनंतपुरम २ हजार ९००, कोल्लम २ हजार ७१७, मलप्पुरम २ हजार ५८०, पलक्कड २ हदार २८८, कोट्टायम २ हजार २१४, अलप्पुझा १ हजार ६४५, कन्नूर १ हजार ४३३ जणाना कोरोना संसर्ग झाला आहे. सध्या केरळच्या विविध जिल्ह्यांमध्ये 6 लाख ८ हजार २२८ रूग्णांना देखरेखेखाली ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


कोरोना महामारीत TB ने होणाऱ्या मृत्यूत १९२ पटीने वाढ

 

- Advertisement -