घरदेश-विदेशMorgan Stanley Report : मोदींच्या नेतृत्वात भारताची गगन भरारी

Morgan Stanley Report : मोदींच्या नेतृत्वात भारताची गगन भरारी

Subscribe

 

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद् मोदी यांच्या नेतृत्वात भारताने गगन भरारी घेतली आहे. जागतिक पातळीवर भारताची महत्त्वाचे स्थान मिळवण्याकडे वाटचाल सुरु आहे, असा अहवाल अमेरिकेतील कंपनी Morgan Stanley Report प्रसारीत केला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत आशिया आणि जगाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.  आगामी दशकात जागतिक विकासात भारताचा पाचवा हिस्सा असणार आहे, असे भाकीत या अहवालात करण्यात आले आहे.

या अहवालात भारतीय शेअर बाजारावरही भाष्य करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षात भारतीय शेअर बाजाराने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. असे असेल तरी २०१४ नंतर भारतात झालेल्या बदलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा अहवालात देण्यात आला आहे.  भारतातील कॉर्पोरेट कर दर इतर देशांप्रमाणे करण्यात आला आहे. पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीत वाढत झाली आहे. जीएसटीने मोठा महसूल मिळत आहे. डिजिटल व्यवहारांमुळे पारदर्शकता आली आहे. जे अर्थव्यवस्था वाढीस पोषक आहे, असेही हा अहवाल सांगतो.

भारताच्या निर्यातीतही झपाट्याने वाढ होत आहे. सन २०३१ पर्यंत जागतिक बाजारात भारताचा निर्यातीमधील सहभाग ४.५ टक्के असेल. सध्या भारताचे प्रतिव्यक्ति उत्पन्न २२०० डॉलर आहे. सन २०३२ मध्ये यात वाढवून प्रतिव्यक्ति उत्पन्न ५२०० डॉलर होण्याचे संकेत अहवालात देण्यात आले आहेत.

हेही वाचाःGDP RATE : रघुराम राजन दर्जेदार दारू पितात…; भाजप नेत्याची टीका

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काही चिंताजनक बाबीही अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. जागतिक मंदी, लोकसभा निवडणुकीत त्रिशंकू स्थिती, कुशल मनुष्यबळ नसणे, या गोष्टी भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतात, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत IMF ने वर्तवला होता अंदाज

कोरोना काळानंतर जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. अशातच 2023मध्ये इतर देशांबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेलाही सौम्य मंदीचा सामना करावा लागू शकतो. तथापि, इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था  चांगल्या स्थितीत असेल. आर्थिक वर्ष 2023मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 6.8 टक्क्यांवरून 6.1 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्तवला होता.

दोन हजाराची नोट बाद केल्याने मोदी सरकारवर निशाणा

दोन हजारांची नोट (₹ 2000 Note) चालू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवादाची कंबर तोडणार होते व आता तीच दोन हजारांची नोट बंद करून मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेचीकंबर तोडत आहेत. कारण मणिपूरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत दहशतवादाची कंबर अजिबात तुटलेली नाही. हिंसाचार व दहशतवाद सुरूच आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्ड्यात घालण्याचा चंगच मोदी यांनी बांधलेला दिसतोय, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा जो खेळखंडोबा सुरू आहे, त्यास इतिहासात तोड नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून तडकाफडकी बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2016च्या घातकी नोटाबंदीनंतर दोन हजारांच्या नोटांच्या छपाईसाठी कोट्यवधींचा खर्च झाला. तो सर्व खर्च पाण्यात गेला, असे ठाकरे गटाने ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -