घरदेश-विदेशMorning Consult survey : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, जगभरात क्रमांक एकवर

Morning Consult survey : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, जगभरात क्रमांक एकवर

Subscribe

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची लोकप्रियता दरवर्षी वाढतच आहे. अमेरिकन फर्म मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणानुसार (Morning Consult survey) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त वाढली असल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी हे अव्वल स्थानावर असून त्यांचे रेटिंग 78 टक्के आहे. त्यापाठोपाठ स्विस राष्ट्राध्यक्ष अॅलेन बेर्सेट, मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा क्रमांक लागतो. दोन महिन्यांपूर्वीच्या सर्वेक्षणात मोदींचे रेटिंग 76 टक्के होते.

अमेरिकन फर्म मॉर्निंग कन्सल्टने जागतिक नेत्याबाबत सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात 22 देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा समावेश आहे. जपानमधील हिरोशिमा येथे होणाऱ्या जी-7 (G-7) शिखर परिषदेत यावेळी फारसे लोकप्रिय नसलेल्या नेत्यांची संख्या अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र, लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर असल्याचे या सर्वेक्षणाची निष्कर्ष आहे.

- Advertisement -

मॉर्निंग कन्सल्टने 22 देशांमध्ये हे सर्वेक्षण केले आहे. त्यात काही असे देशाचे नेते आहेत, ज्यांच्या लोकप्रियतेला काही ना काही कारणांमुळे धक्का लागला आहे. अमेरिका, जपान, फ्रान्स, ब्रिटनसह अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांना वेगवेगळ्या कारणांमुळे सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

- Advertisement -

ज्या नेत्यांची लोकप्रियता घटल्याचे समोर आले आहे, त्यातल्या काही देशांत तर अशी परिस्थिती आहे की, आज निवडणुका झाल्यास या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागू शकते, असा दावाही मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांच्या पक्षाचा समावेश आहे. याशिवाय जर्मन चान्सलर स्कोल्झ यांचा पक्षही निवडणुकीत पराभूत होऊ शकतो, असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

या वर्षी मार्चमध्येही मॉर्निंग कन्सल्टचा सर्व्हे समोर आला होता, ज्यामध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर होते. मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्टमध्ये नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर होते. त्यावेळी देखील 22 देशांच्या नेत्यांना मागे टाकत त्यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत पहिले स्थान मिळवले होते. सर्वेक्षणात मोदींचे रेटिंग 76 टक्के होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -