घरक्राइमMoscow Attack : मॉस्कोत दहशतवादी हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी; ISISनं...

Moscow Attack : मॉस्कोत दहशतवादी हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी; ISISनं स्वीकारली जबाबदारी

Subscribe

रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोतील क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 60 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हल्ल्याची आयसिसने जबाबदारी स्वीकारली असून आमचे हल्लेखोर सुरक्षितपणे माघारी परतल्याचेही आयसिसने म्हटले.

मॉस्को : रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोतील क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 60 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हल्ल्याची आयसिसने जबाबदारी स्वीकारली असून आमचे हल्लेखोर सुरक्षितपणे माघारी परतल्याचेही आयसिसने म्हटले. ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांचे फोटो रशियन माध्यमांनी शेअर केले आहेत. हल्लेखोरांची चेहरेपट्टी आशियाई आणि कॉकेशियाई लोकांसारखी होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यासंदर्भातील अधिक तपास रशियन पोलीस करत आहेत. (Moscow Gunmen Kill More Than 60 In Concert Attack Islamic State Claims Responsibility)

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मॉस्कोमधील क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये सोव्हिएत काळातील प्रसिद्ध म्युझिक बँड ‘पिकनिक’कडून सादरीकरण सुरू होतं. या कॉन्सर्टला 6200 जण हजर होते. त्यावेळी सैनिकांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गोळीबारानंतर त्यांनी स्फोट घडवला. त्यामुळे कॉन्सर्ट हॉलला आग लागली. या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 60 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी आहेत.

- Advertisement -

दहशतवादी इन्गुशेतियाचे मूळ रहिवासी असल्याचा रशियन माध्यमांचा दावा आहे. तसेच, हल्लेखोरांची चेहरेपट्टी आशियाई आणि कॉकेशियाई लोकांसारखी होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. हल्लेखोर रशियन भाषेत बोलत नव्हते. परकीय भाषेतून त्यांचा संवाद सुरू होता, असाही दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. विशेष म्हणजे दहशतवादी संघटना आयसिसनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आमच्या हल्लेखोरांनी मॉस्कोच्या वेशीवरील क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये हल्ला केला, अशी माहिती आयसिसनं त्यांच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून दिली आहे.

सद्यस्थितीत दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून सातत्यानं घडामोडींचा आढावा घेतला जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानं या निर्घृण हल्ल्याचा निषेध करावा, असं आवाहन रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Air India : एक नियम मोडला अन् डीजीसीएने एअर इंडियाला ठोठावला 80 लाखांचा दंड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -