घरदेश-विदेशकोरोना संकटादरम्यान डासांनी होणाऱ्या आजारांमुळे वाढू शकतो धोका! आरोग्य विभागाचा इशारा

कोरोना संकटादरम्यान डासांनी होणाऱ्या आजारांमुळे वाढू शकतो धोका! आरोग्य विभागाचा इशारा

Subscribe

पावसाळा सुरू असून या हंगामात होणाऱ्या डासांच्या पैदाशीमुळे अनेक आजार निर्माण होण्याची शक्यता असते. अशातच कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसतोय. पावसाळ्यात डासांमुळे होणारे रोग कोरोनाबरोबर वाढल्यास अधिक धोका वाढू शकतो, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिला. तसेच आरोग्य मंत्रालयाने लोकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केले. यावेळी आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना असे सांगितले की, काळजी घ्या, अन्यथा कोरोनाचा संसर्ग अधिक धोकादायक ठरू शकतो. विशेष म्हणजे मंत्रालयाने असे आवर्जून सांगितले की, पावसाळा होई पर्यंत नागरिकांना अधिक खबरदारी घ्यावी.

पावसाळ्यात डासांपासून होणारे रोग आणि पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका सर्वाधिक असतो. अशा परिस्थितीत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजाराचा धोका जास्त असतो. हे सर्व आजार टाळणे आवश्यक आहे कारण कोरोना महामारीसह हे रोग अत्यंत धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

- Advertisement -

पावसाळा सुरू झाला की डासांमुळे होणारे आजार डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढतात. हे रोग माणसाची रोगप्रतिकारक शक्ती हळू हळू नाहिशी करतात. अशा रोगांच्या दरम्यान कोरोना झाल्यास रुग्णाच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता असते. म्हणूनच पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या आजाराते संक्रमण टाळणे गरजेचे आहे. डासांमुळे होणाऱ्या आजारापासून स्वत: ला वाचविण्यासाठी कोरोनाच्या नियमांसह तुम्हाला अजून काळजी घ्यायची आहे. जसे की घरात डासांची जाळी वापरा, घरात आणि आसपास पाणी साचू देऊ नका, स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. यासह घरात किंवा घराबाहेर पडताना पूर्ण कपडे आवर्जून घाला.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -