Corona Pandemic: महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात कोरोनाचं सर्वाधिक थैमान!

WHO said the covid 19 virus was in the epidemic
जग कोरोना संकटातून लवकर मुक्त होणार नाही, WHO ने दिला इशारा

देशात कोरोनाचा कहर गेल्या दीड वर्षापासून सुरू असून अद्याप कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस कमी-जास्त होताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी देशात असं चित्र होतं की महाराष्ट्र या राज्यातून सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद केली जायची मात्र आता महाराष्ट्राला मागे टाकत या राज्यात कोरोनाचं थैमान सुरू असल्याचे समोर आले आहे. हे राज्य म्हणजे केरळ होय. केरळ हे भारताचे दक्षिणेकडील राज्य असून सध्या कोरोना महामारीविरूद्ध चांगलाच लढा देत आहे. केरळमध्ये बाधितांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. येथे दररोज नवीन रूग्णांची नोंद केली जात असून ही संख्या 10 हजाराहून अधिक येत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केरळमध्ये कोरोना संसर्गाची गती वाढत असून अनेक आठवड्यांत संसर्गाचे प्रमाण हे दहा टक्क्यांच्या आसपास होते आणि ते आता 11.08 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

देशात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर केरळमध्ये

देशातील साधारण 10.18 टक्के संसर्ग एकट्या केरळ राज्यातील असल्याची माहिती आहे तर उर्वरित देशांच्या तुलनेत केरळमधील कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर हा सध्या देशात सर्वाधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या 24 तासांत 14 हजार 131 नवीन रुग्ण आढळले असून 105 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात येत आहे. केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असून कोरोना रूग्णांची एकूण संख्या 32 लाखाहून अधिक आहे. तर संपूर्ण देशात कोरोना प्रकरणांची एकूण संख्या 3 कोटी 12 लाख 93 हजार 62 आहे. म्हणजेच, संसर्गाचे प्रमाण 10 टक्के पेक्षा जास्त रूग्ण एकट्या केरळमधील आहेत. उर्वरित देशांच्या तुलनेत केरळमधील कोरोना पॉझिटिव्हिटी दर सध्या देशात सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे.

24 आणि 25 जुलै रोजी संपूर्ण लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुन्हा एकदा केरळ मध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. फक्त शनिवारी 24 आणि रविवारी 25 जुलै रोजी संपूर्ण लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. केरळ सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार 24 आणि 25 जुलै रोजी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान, मंगळवारी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी असे सांगितले की, राज्यात असलेल्या कोविड -१९ निर्बंध आणखी काही आठवडे सुरू राहतील, कारण चाचणी संसर्गाची सरासरी दर अजूनही १० टक्क्यांहून अधिक आहे.