घरट्रेंडिंगजगातील सर्वात महागडे लाकूड; फक्त एक किलोची किंमत ऐकून व्हाल थक्क!

जगातील सर्वात महागडे लाकूड; फक्त एक किलोची किंमत ऐकून व्हाल थक्क!

Subscribe

जाणून घ्या, या दुर्मिळ लाकडाविषयी...

काही वृक्षांचे लाकूड प्रंचड महागडे असते तर काही वृक्षांचे लाकूड अत्यंत दुर्मिळ आहे. जसे चंदनाच्या लाकडाला विशेष मागणी असते. त्यामुळे ते महाग असते. ज्याची किंमत प्रति किलो पाच ते सहा हजार रुपये असते, परंतु जगात असे एक लाकूड आहे, ज्याची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या लाकडाची किंमत चंदनाच्या लाकडाच्या किंमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त महाग आहे. सर्वात मोठा श्रीमंतही हे लाकूड विकत घेण्यापूर्वी नक्कीच दोनदा विचार करेल यात शंका नाही.

आफ्रिकन ब्लॅकवुड असे या महागड्या लाकडाचे नाव आहे. हे पृथ्वीवरील उपलब्ध असलेल्या सर्वात मौल्यवान साहित्यांपैकी आहे. या लाकडाची केवळ एक किलोग्रॅम किंमत आठ हजार पौंड किंवा सात लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. इतर झाडांच्या तुलनेत आफ्रिकन ब्लॅकवुड वृक्ष पृथ्वीवर अत्यंत दुर्मिळ लाकडांपैकी एक आहे. त्यांची उंची सुमारे २५ ते ४० फूट आहे. आफ्रिकन ब्लॅकवुड्स हे मध्य आणि दक्षिण आफ्रिकेतील २६ देशांमध्ये आढळत असून बहुधा ते कोरड्या जागी आढळतात.

- Advertisement -

या झाडाची संपूर्ण वाढण्यास साधारण ६० वर्षे लागतात, परंतु केनिया आणि टांझानियासारख्या देशांत लाकूडांची अवैध तस्करी केल्यामुळे अशा झाडांची अकाली छाटणी केली जाते. या कारणामुळेच ब्लॅकवुडची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ती दुर्मिळ बनली आहे.

आफ्रिकन ब्लॅकवुड्सच्या लाकडाचा वापर मुख्यतः शहनाई, सनई, बासरी आणि गिटार सारखी वाद्ये तयार करण्यासाठी केला जातो. याशिवाय या लाकडापासून मजबूत आणि टिकाऊ फर्निचर देखील बनविले जाते, परंतु ते बरेच महाग असल्याने सामान्य लोकांना ते खरेदी करणं शक्य नसते.


बंगालमध्ये लोकल सुरु करण्यास रेल्वे मंत्रालयाची परवानगी; मुंबईकर प्रतिक्षेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -