Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी लस घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणे; पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांसाठी WHO च्या सूचना

लस घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणे; पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांसाठी WHO च्या सूचना

Related Story

- Advertisement -

आता लसीचे दोन्ही डोस घेतलेले लोकं कोरोनाचा शिकार होत आहेत. यामध्ये जास्तीत जास्त केसेस डेल्टा व्हेरियंटच्या  आहेत. लसीचे डोस मृत्यू आणि गंभीररित्या आजारी पडण्यापासून लोकांचा वाचवत आहेत, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचा केला होता. पण आता जागातिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, लस घेतलेल्या लोकांना आता डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे.

डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की, जिथे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, तिथे रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण अधिक आहे. डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग वेगाने पसरत आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशननुसार, लसीकरणानंतर रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे ७५ टक्के केसेस ६५ वर्षांहून जास्त वयोगटातील आहेत.

- Advertisement -

लसीचे दोन डोस घेतल्याने सुरक्षित झाले आहेत म्हणून संसर्ग होण्यापासून बचाव होता असे नाही. अशा लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाही आणि यामुळे लोकांमध्ये सहजरित्या संसर्गाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

काही अभ्यासातून असा दावा केला आहे की, लस घेतलेल्या लोकांमध्ये व्हायरसचा संसर्ग कमी होतो. त्यामुळे दुसऱ्या लोकांपर्यंत व्हायरस सामान्यपणे पोहोचवू शकत नाही. पण जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, हे समजण्यासाठी काही अजून संशोधनावर काम करणे गरजेचे आहे. अलीकडेच Zoe Covid Symptom study मध्ये वेगवेगळी लक्षणे आढळली आहेत, जे गेल्या आठवड्यात समोर आली आहेत. पहिला आणि दुसरा लसीचा डोस घेतल्यानंतर ही पाच लक्षणे दिसत आहेत.

पहिला डोस घेतल्यानंतरची लक्षणे

- Advertisement -

अहवालानुसार, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर काही लोकांना संसर्ग झाल्यावर डोकेदुखी, नाक वाहणे, घसा खवखवणे, शिंका येणे आणि सतत खोकला येणे अशी लक्षणे दिसू शकतात. ही सर्व लक्षणे कोरोनाच्या सामान्य लक्षणांसारखीच आहेत.

दुसरा डोस घेतल्यानंतरची लक्षणे

जर दोन्ही डोस घेऊनही कोणाला संसर्ग होत असेल तर त्यांच्यामध्ये डोकेदुखी, नाक वाहणे, शिंका येणे, घसा खवखवणे आणि थोड्या प्रमाणात वास घेण्याची क्षमता कमी होणे ही लक्षणे दिसून येतात.

लस न घेतल्यावर काय होईल?

Zoe studyच्या नुसार, जर कोणता व्यक्ती लस घेत नाही आणि तो कोरोनाचा शिकार होतो. तर त्याच्यामध्ये डोके दुखी, घशात खवखव, नाक वाहणे, ताप आणि सतत खोकल्यासारखी लक्षणे दिसून येतात. यात श्वास घेण्यास त्रास होणे आणि वास येणे बंद होण्यासारखी लक्षणे प्रमुख असतात.


हेही वाचा – कोरोना लसीच्या डोसचे Mixing And Matching धोकादायक ठरू शकते – WHO


 

- Advertisement -