घरदेश-विदेशजीवनसत्व आणि खनिजे आरोग्याला पूरक नाहीत - अभ्यासातून झालं सिद्ध

जीवनसत्व आणि खनिजे आरोग्याला पूरक नाहीत – अभ्यासातून झालं सिद्ध

Subscribe

आतापर्यंत आरोग्याला जीवनसत्त्व आणि खनिजे आवश्यक असतात असाच समज प्रत्येकाला होता. मात्र आता प्रसिद्ध असणारी ही जीवनसत्वं आणि खनिजे ही आरोग्याला पूरक नसल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. हे वाचून नक्कीच आपल्याला धक्का बसेल. पण वॉशिंग्टनमधील सेंट मायकेल रुग्णालयात घेतलेल्या अभ्यासानुसार हे सिद्ध झाले आहे.

वॉशिंग्टनमधील अभ्यास
वॉशिंग्टनमधील सेंट मायकेल रूग्णालयाने घेतलेल्या अभ्यासानुसार, ह्रदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग, ह्रदयविकाराचा झटका अथवा अकाली मृत्युपासून वाचण्यासाठी कोणतीही जीवनसत्व अथवा खनिजे ही आरोग्याला पूरक नसतात. जानेवारी २०१२ ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान करण्यात आलेल्या परिक्षणात अकाली मृत्यू अथवा रक्तवाहिन्यांशी संबंधित कोणत्याही रोगासाठी काळजी घेण्यासाठी अनेक जीवनसत्व, जीवनसत्व ड, कॅल्शियम आणि जीवनसत्व क याच्यामुळे कोणताही फायदा शरीराला होत नसल्याचे आढळले.

- Advertisement -

आहारासाठी पूरक नाहीत
साधारणपणे, अन्नामध्ये आढळणारी जीवनसत्व आणि खनिजं ही पूरक आहारासाठी घेतली जातात. लोक सर्वात जास्त खात असलेल्या सामान्य पूरक आहाराचं निरीक्षण केल्यानंतर काही सकारात्मक परिणाम दिसल्यानं आश्चर्य वाटल्याचं अभ्यासाचे प्रमुख लेखक डेव्हिड जेनकिन्स यांनी सांगितलं आहे. फॉलिक अॅसिड आणि जीवनसत्व ब हे ह्रदयाशी संबंधित रोग कमी करण्यासाठी पूरक असल्याचंही अभ्यासातून सिद्ध झालं आहे.
या निष्कर्षांवरून असं सुचवण्यात आलं आहे की, लोकांनी आपल्या शरीराला आवश्यक पदार्थांची जाणीव करून घ्यावी आणि त्यांच्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी आवश्यक जीवनसत्व खावे असंही जेनकिन्स यांनी नमूद केलं आहे.
जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीमध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -