Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश लाल किल्ला हिंसाचार प्रकरण: मुख्य आरोपी महिंदर सिंगला अटक

लाल किल्ला हिंसाचार प्रकरण: मुख्य आरोपी महिंदर सिंगला अटक

दोन तलवारी जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई

Related Story

- Advertisement -

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या. यावेळी लाल किल्ल्यावर जाऊन धार्मिक ध्वज फडकवत पोलिसांना मारहाण करत हिंसाचार घडवणाऱ्या एका गटाची माहिती समोर आली होती. यानंतर हिंसा घडवणाऱ्या आरोपींवर कारवाईचे सत्र सुरु झाले. यात आता लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. महिंदर सिंग उर्फ मोनी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. मोनीच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे. यापूर्वी अभिनेता दीप सिद्धूलाही अटक करण्यात आली.

- Advertisement -

महिंदर सिंग याच्यावर लाल किल्लावर घडलेल्या हिंसाचारातील मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप आहे. ३० वर्षीय मोनी दिल्लीतीलच स्वरूप नगर येथे वास्तव्यास आहे. दीप सिद्धूनंतर दिल्ली पोलिसांकडून इतर अनेक जणांची शोध मोहिम सुरु आहे. यातच महिंदर सिंग याचाही दिल्ली पोलीस अनेक दिवसांपासून शोध घेत होते. याचदरम्यान पितम पुरा बस स्थानकाजवळून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये महिंदर तलवारीसह हिंसाचारात सहभागी झालेल्याचे दिसत होते. सध्या दिल्ली पोलिसांकडून आरोपी महिंदर सिंगची कसून चौकशी सुरु आहे. चौकशीतदरम्यान महिंदरकडून हिंसाचारासंदर्भातील अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात अभिनेता दीप सिद्धूबरोबरच महिंदर सिंग मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा- राजदीप सरदेसाईंवर कारवाई नाही, सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण

- Advertisement -