घरदेश-विदेशमुलाच्या मृत्यूनंतरचं दु:ख सहन न झाल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल...

मुलाच्या मृत्यूनंतरचं दु:ख सहन न झाल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल…

Subscribe

बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूनंतरचं दु:ख सहन न झाल्याने आईने टोकाचं पाऊल उचललं. लेकाच्याच जळत्या चितेत उडी मारली. तिथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थानी त्या महिलेला चितेतून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्या महिलेचा जवळपास ७० टक्के शरीराचा भाग भाजल होता. उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार , सुखासन वार्ड ६ मध्ये राहणारा सिकंदर यादव यांचा मुलगा करण कुमार हा मधेपुरा रोडवरील झिकटीया येथील एका दुकानात काम करायचा. रविवारी करण ने दुकानातील फोन वरून चुकून कोणाला तरी १५०० रूपये पाठवले.

- Advertisement -

त्यानंतर दुकानदाने पैशांची मागणी करत त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि करणच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. रात्री उशिरा काकांनी दुकानदाराला पैसे परत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याचा फोन परत केला.

त्यानंतर सोमवारी सकाळी करणचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सायंकाळी करणचं अंत्यसंस्कार करून कुटुंबीय घरी परतले. मात्र त्याची आई रात्री घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी तिचा पाठलाग केला, पण स्मशानभूमी पोहोचेपर्यंत तिने आपल्या मुलाच्या चितेत उडी घेतली.

- Advertisement -

गावकऱ्यांनी त्या महिलेला कसेबसे बाहेर काढले. त्यांना मधेपुरा मेडिकल कॉलेज कम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे, पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुण कुमार यांनी सांगितले की, अशा घटनेची माहिती मिळाली आहे. मात्र कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही, लेखी अर्ज मिळाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील होईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -