मेस्सीला भेटण्यासाठी 5 मुलांच्या आईने रस्तामार्गे केरळहुन गाठलं कतार

क्रिकेटपटू असो वा फुटबॉलपटू त्यांना भेटण्यासाठी अनेकदा चाहत्यांनी मैदानात धाव घेतल्याचे आपण पाहिले आहे. बऱ्याचदा खेळाडूंचे फोटो चाहते अंगावर टॅटू म्हणून काढतात. सध्या कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक २०२२ सुरू असून, अनेक चाहते विमानाचे तिकीट बुक करून आणि सामन्यांचे माहागडे तिकीट बुक करून मैदानात हजेरी लावत आहेत.

क्रिकेटपटू असो वा फुटबॉलपटू त्यांना भेटण्यासाठी अनेकदा चाहत्यांनी मैदानात धाव घेतल्याचे आपण पाहिले आहे. बऱ्याचदा खेळाडूंचे फोटो चाहते अंगावर टॅटू म्हणून काढतात. सध्या कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक २०२२ सुरू असून, अनेक चाहते विमानाचे तिकीट बुक करून आणि सामन्यांचे माहागडे तिकीट बुक करून मैदानात हजेरी लावत आहेत. अशातच मेस्सीच्या एका महिला चाहतीने कतारमध्ये हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे ही महिला चाहती भारतातल्या केरळमधील असून ती आपल्या ‘कस्टमाइज्ड एसयूव्ही’ने कतारमध्ये पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेस्सीची ही महिला चाहती 5 मुलांची आई आहे. नाजी नौशी (33) असे या चाहतीचे नाव आहे. तिने १५ ऑक्टोबरला केरळमधून आखाती देशांचा प्रवास सुरू केला आणि यूएई गाठली. सौदी अरेबियाकडून अर्जेंटिनाच्या पराभवामुळे त्याचे मन दुखले असले तरी पुढील सामन्यात अर्जेंटिना विजयासह पुनरागमन करेल, अशी तिला आशा होती आणि तसे झाले.

दरम्यान, वृत्तपत्राने तिचा हवाला देत म्हटले की, ‘मला माझा ‘हिरो’ लिओनेल मेस्सीला खेळताना बघायचा आहे. सौदी अरेबियाकडून झालेला पराभव माझ्यासाठी निराशाजनक होता. पण मला खात्री आहे की ट्रॉफी जिंकण्याच्या मार्गात तो किरकोळ अडथळा आहे.

नौशीच्या अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही तेच घडले. मेस्सीने शानदार खेळ करत एक गोल केला. या सामन्यात त्याने दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले. अर्जेंटिनाने शानदार पुनरागमन करत हा सामना 2-0 असा जिंकला आणि नौशीचे स्वप्न साकार झाले.

नौशीने प्रथम तिची ‘SUV’ मुंबईहून ओमानला दिली आणि योगायोगाने उजव्या हाताच्या स्टीयरिंगसह देशात पाठवलेली ही पहिली भारतीय नोंदणीकृत कार आहे. तिने मस्कत येथून प्रवास सुरू केला आणि हटा बॉर्डरवरून तिच्या एसयूव्हीमध्ये यूएईला पोहोचले. यादरम्यान ती दुबईतील जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा पाहण्यासाठी थांबली.

SUV मध्ये घरातील ‘स्वयंपाकघर’ आहे. नौशीने कारचे नाव ‘ओलू’ ठेवले आहे, ज्याचा मल्याळममध्ये ‘ती’ (स्त्री) अर्थ आहे. नौशीने तांदूळ, पाणी, मैदा, मसाले आणि इतर सुक्या गोष्टी गाडीत ठेवल्या आहेत. तिने वृत्तपत्राला सांगितले की, ‘मी स्वतः स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते. यामुळे पैशांची नक्कीच बचत होते आणि ‘फूड पॉयझनिंग’चा धोकाही कमी होतो.


हेही वाचा – धक्कादायक! जगभरात १.३७ लाख कर्मचाऱ्यांना नारळ, ‘या’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कपात