घरCORONA UPDATELockDown: आईने पाठवले किराणा आणायला; मुलगा घेऊन आला सून

LockDown: आईने पाठवले किराणा आणायला; मुलगा घेऊन आला सून

Subscribe

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये आईने आपल्या मुलाला घरातील किराणा सामना आणण्यासाठी पाठवले असता तो मुलगा चक्क लग्न करून आईसाठी सून घेऊन आल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेने सहिबाबाद पोलीस ठाण्यात यासंबंधीची तक्रार दाखल केली असता ही बाब उघडकीस आली. मी माझ्या मुलाला बाजारात किराणा माल आणण्यासाठी पाठवले होते. पण तो परत आला ते लग्न करून. मला हे लग्न मान्य नाही, असे त्या महिलेने पोलिसांना रडतरडत सांगितले.

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

महिलेचा मुलगा गुड्डू (वय २६) याने पोलिसांना सांगितले की, मी सवितासोबत दोन महिन्यांपूर्वीच हरिद्वार येथील आर्य समाज मंदिरात लग्न केले आहे. मात्र आम्हाला लॉकडाऊनमुळे लग्नाचे प्रमाणपत्र मिळाले नाही. मी पुन्हा हरिद्वारला जाऊन लग्नाचे प्रमाणपत्र आणण्याचे ठरवले. पण ते शक्य झाले नाही. हरिद्वारवरून परतल्यानंतर सविता दिल्लीत राहू लागली. मात्र आज मी तिला माझ्या घरी आणले आहे. या कौटुंबिक तिढ्याचा गुंता कसा सोडवावा हे काही पोलिसांना समजत नव्हते. अखेर पोलिसांनी सविताचे दिल्लीतील घरमालक यांना दोघ नवरा-बायकोला लॉकडाऊन संपेपर्यंत तिथे राहण्याची अनुमती देण्यास सांगितले.

हेही वाचा –

Lockdown: सूरतच्या वस्त्रोद्योगाचं ५०० ते ६०० कोटींचं नुकसान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -