घरदेश-विदेशमदर टेरेसा आश्रमाविरोधात मुले विकण्याचा गुन्हा

मदर टेरेसा आश्रमाविरोधात मुले विकण्याचा गुन्हा

Subscribe

बाल कल्याण समितीने केलेल्या तक्रारीनंतर केला गुन्हा दाखल

रांची येथील मदर टेरेसा आश्रमातून अर्भकाला विकल्या प्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल नोदंवण्यात आला आहे. या प्रकरणी रांची पोलिसांनी एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली असून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रांची येथील ‘मिशनरी ऑफ चॅरिटी’ संस्थेची स्थापना नोबेल पुरस्कार विजेता ‘मदर टेरेसा’ यांनी केली होती. या आश्रमातून अर्भकाला १ लाख २० हजार रुपयांना विकण्यात आले होते. विकलेल्या दाम्पत्याला १४ दिवसांनी अर्भक परत मागितले असल्याने त्यांनी बाल कल्याण समितीकडे मदत मागितली. बाल कल्याण समितीने या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. मिशनरी ऑफ चॅरिटी संस्थेवर या पूर्वीही मुले विकण्याचा आरोप करण्यात येत आहे.

नेमके काय झाले?

उत्तर प्रदेश येथील सोनभद्र जिल्हातील एका दाम्पत्याला मुल हवे होते. मुलासाठी त्यांनी राची येथील निर्मल हृदय संस्थेला गाठले. निर्मल हृदय ही संस्था मिशनरी ऑफ चॅरिटी संस्थेच्या आंतर्गत काम करते. १ मे रोजी या दाम्पत्याकडून १ लाख २० हजार रुपये घेऊन अर्भक देण्यात आले होते. १४ मे रोजी संस्थेने अर्भक परत मागितले मात्र त्यांनी देण्यास नकार दिला. १ जूलै रोजी त्यांनी मुलाचा ताबा मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दाम्पत्याला संस्थेमध्ये बोलावले होते. यावेळी अभ्रकाला त्यांच्या पासून हिसकावून घेतले. या घटनेनंतर दाम्पत्याने बाल कल्याण समितीकडे मदत मागितली. समितीच्या अध्यक्षा रुपा वर्मा यांनी संस्थेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

रांची येथील निर्मल हृदय संस्था अविवाहित मांतासाठी बनवल्या गेलेले आश्रम आहे. विकलेल्या अभ्रकाच्या आईने मार्च महिन्यामध्ये या आश्रमात आश्रय घेतला होता. १ मे रोजी रांची येथील सरदार रुग्णालयात यामुलाचा जन्म झाला होता. जन्म झाल्यानंतर काही तासांमध्येच या मुलाला १ लाख २० हजारांमध्ये विकण्यात आले. सध्या १३ गरोदर महिला या आश्रमात राहत आहेत. या घटने नंतर या महिलांचे दूसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -