घरदेश-विदेशसंस्कृतचा प्रसार करण्यासाठी गुगलसोबत सामंजस्य करार, विविध भाषांमध्ये होणार अनुवाद

संस्कृतचा प्रसार करण्यासाठी गुगलसोबत सामंजस्य करार, विविध भाषांमध्ये होणार अनुवाद

Subscribe

मुंबई – भारत हा विविध भाषांनी समृद्ध असा देश आहे. अनेक मातृभाषांसह अनेक बोलीभाषा भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोलल्या जातात. याच भाषांच्या संवर्धनासाठी अनेक संस्था प्रयत्नशील आहे. आता भारतातील सर्वांत जुनी संस्कृत भाषेच्या संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सने (ICCR) ने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, ICCR ने गुगलसोबत सामंजस्य करार केला असून यामाध्यमातून संस्कृत भाषेतील साहित्य इतर भाषेत तंत्रज्ञानाचा वापर करून अनुवादित करता येणार आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमता आणि मशीन लर्निंगचा वापर केला जाणार आहे.

हेही वाचा – सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला डॉल्फिनच भन्नाट व्हिडीओ तुम्हीसुद्धा पाहिलात का?

- Advertisement -

ICCR चे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि Google च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत याविषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. त्यानुसार, संस्कृत भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी करार करण्यात आला आहे. या करारावर विनय सहस्रबुद्धे आणि गुगलच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे.

सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या एक संस्कृतमधील एक लाख ओळींचा इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनुवाद उपलब्ध केला जाणार आहे. यासाठी प्राध्यापक अमरजीव लोचन यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली विद्यापीठातील संस्कृत विभागाचे विद्यार्थी आणि शिक्षक मदत करणार आहेत.

- Advertisement -

 

गुगल ट्रान्सलेटमध्ये आठ भारतीय भाषांचा नुकताच समावेश करण्यात आला. आसामी, भोजपुरी, डोगरी, कोकणी, मैथिली, मिझो आणि मीतेइलॉन (मणिपुरी) या भाषाही गुगल ट्रान्सलेटमध्ये समाविष्ट आहेत.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -