पंजाबचे कॉंग्रेस सरकार राहुल गांधींनी बुडवले, शिवराज सिंह चौहान यांची टीका

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नादात राहुल गांधी यांनी अमरिंदर सिंह यांना हटवले आणि आता नवज्योत सिद्धू देखील पळाले

RSS defamation case Petition against Rahul Gandhi to be heard in Bhiwandi court on February 5
RSS defamation case: राहुल गांधीं विरोधातील याचिकेची ५ फेब्रुवारी रोजी भिवंडीतील जलद कोर्टात सुनावणी, काय आहे प्रकरण?

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ( Capt. Amarinder Singh resigns) दिल्यानंतर काँग्रेसच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू (Navjyot Singh Sidhu) यांनी देखील राजीनामा दिला. काँग्रेसमधील महत्त्वाच्या नेत्यांच्या नाजीनामान्यानंतर पंजाबमधील राजकारण चांगलेच खवळले आहे. त्यातच काँग्रेसचे नेते राहुला गांधी यांच्यावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान  (Shivraj Singh Chouhan) यांनी ‘राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवत आहेत’,असे म्हणत राहुल गांधींवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी असे पर्यंत आम्हाला काहीही करण्याची गरज नाही,असे देखील चौहान यांनी म्हटले.

राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत, ‘पंजाबमध्ये चांगले अमरिंदर सिंह मुख्यमंत्री होते मात्र नवज्योत सिंग सिध्दू यांच्या नादात राहुल गांधींनी पंजाबमधील काँग्रेसचे सरकार संपवले’, असा टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे ‘नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नादात राहुल गांधी यांनी अमरिंदर सिंह यांना हटवले आणि आता नवज्योत सिद्धू देखील पळाले, त्यामुळे आता राहुल गांधी असे पर्यंत आम्हाला काहीही करण्याची गरज नाही’,असे म्हणत चांगलेच टीकास्त्र डागळले आहे. एका कार्यक्रमात चौहान यांनी राहुल गांधीवर सडकून टीका केली. त्यांचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

तर ‘नवज्योत सिंह सिद्धू हे दिशाहीन मिसाईल आहे. त्यांना कुठे जायचे हे माहिती नाही. त्यांनी सर्वात आधी पंजाब काँग्रेस अध्यक्ष होऊन अमरिंदर सिंग यांचा नाश केला आणि पक्षाचा देखील नाश केला’,असे म्हणत शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी नवज्योत सिद्धू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.


हेही वाचा – नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसला गळती