घरCORONA UPDATEMP Corona Update : ग्वाल्हेरमध्ये पाच दिवसाच्या नवजात बालकाचा कोरोनामुळे बळी

MP Corona Update : ग्वाल्हेरमध्ये पाच दिवसाच्या नवजात बालकाचा कोरोनामुळे बळी

Subscribe

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगावर थैमान घालत असलेल्या कोरोनाचे सावट पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. या कोरोनाच्या संक्रमणामुळे पाच दिवसाच्या नवजात बालकाला जीव गमवावा लागला आहे. ही घटना मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर या भागात घडली आहे. वास्तविक या चिमुकलीचा जन्म झाल्यापासून ती जास्तच आजारी होती. कोरोनाशिवाय तिला अनेक आजारांचे संक्रमण झाले होते. ग्वाल्हेरच्या मुख्य चिकित्सा अधिकारी बिंदु सिंघल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगावर थैमान घालत असलेल्या कोरोनाचे सावट पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. या कोरोनाच्या संक्रमणामुळे पाच दिवसाच्या नवजात बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर या भागात घडली. वास्तविक या चिमुकलीचा जन्म झाल्यापासून ती जास्तच आजारी होती. कोरोनाशिवाय तिला अनेक आजारांचे संक्रमण झाले होते. ग्वाल्हेरच्या मुख्य चिकित्सा अधिकारी बिंदु सिंघल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ग्वाल्हेरच्या प्रभारी मुख्य चिकित्सा आणि स्वास्थ अधिकारी (CMHO) डॉ. बिंदु सिंघल यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. या मुलीचा जन्म ग्वाल्हेरच्या जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 45 किलोमीटर दूर डबराच्या स्वास्थ केंद्रमध्ये झाला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात बालकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले. मात्र, या मुलीचा जन्म होताच तिला कोविडसह अनेक आजारांनी घेरले होते. त्यामुळे या पाच दिवसाच्या चिमुकलीला डबरामधील स्वास्थ केंद्रातून ग्वाल्हेरच्या मेडिकल कॉलेजच्या कमलाराजा हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

- Advertisement -

मात्र, उपचारादरम्यान, या चिमुकलीचा शुक्रवारी संध्याकाळी मृत्यू झाला. सिंघल यांनी सांगितले की, हे नवजात बालक कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे मृत्यू पावली असे स्पष्टपणे नाही सांगू शकत, कारण ती सुरुवातीपासूनच आजारी होती.दरम्यान, मध्यप्रदेशात कोरोनाचे 11 हजार 253 नवीन प्रकरणे सापडली आहेत.

ओमिक्रॉनचा BA.2 नव्या स्ट्रेन भारतात धडकला

मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहेत. अशातच एक खासगी वैद्यकीय संस्थेच्या प्रयोगशाळेत गेल्या 18 दिवसांत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या BA.20 या नव्या स्ट्रेनचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. या स्ट्रेनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे. यावर शहरातील श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संस्थापक अध्यक्ष विनोद भंडारी यांनी सांगितले की, केंद्र सरकारद्वारे मान्यता प्राप्त मॉलिक्युलर व्हायरोलॉजी डायग्नोस्टिक अँड रिसर्च लॅबमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या BA.2 स्ट्रेनचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. ६ जानेवारीपासून हे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान नव्या BA.2 स्ट्रेनच्या 21 रुग्णांपैकी, सहा रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम एक टक्क्यांपासून 50 टक्क्यांपर्यंत होता.

- Advertisement -

हे ही वाचा – स्वदेशी RT-PCR किट ‘ओम’ करणार आता ओमिक्रॉन व्हेरिएंटचे डिटेक्शन


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -