Homeक्राइमMP Crime News : लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या, फ्रीज बंद केल्यावर पसरली...

MP Crime News : लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या, फ्रीज बंद केल्यावर पसरली दुर्गंघी आणि झाला उलगडा

Subscribe

संजय पाटीदार प्रतिभासोबत पाच वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. उज्जैनमध्येही ते तीन वर्षे राहिले होते. पाटीदार विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. पण प्रतिभा त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती.

(MP Crime News) भोपाळ : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडासारख्या घटना समोर येतच आहेत. आता आणखी एका लिव्ह-इन रिलेशनशिपचा भयानक अंत मध्य प्रदेशात समोर आला आहे. देवासमध्ये एका फ्रीजमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. तो सहा महिने फ्रीजमध्येच होता. तिच्या विवाहित प्रियकराला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या खोलीत मृतदेह ठेवण्यात आला होता त्याच्या शेजारीच दुसऱ्या कुटुंब राहते, परंतु त्याने या भयकथेची जराही कल्पना आली नाही. जेव्हा फ्रीज बंद झाला, तेव्हा दुर्गंधी पसरली आणि हे प्रकरण उघड झाले. (Live-in partner woman killed and body kept in fridge)

पीडित महिलेचे नाव पिंकी ऊर्फ ​​प्रतिभा प्रजापती आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर संजय पाटीदार याला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. स्थानिक व्यावसायी धीरेंद्र श्रीवास्तव यांचे देवासच्या वृंदावन धाममध्ये दोन मजली घर आहे. ते स्वत: सहा महिन्यांपासून दुबईत आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये बलवीर राजपूत नावाच्या व्यक्तीने तळमजल्यावरील घर भाड्याने घेतले होते. पण आधीचा भाडेकरू संजय पाटीदार याने दोन खोल्यांना कुलूप लावले होते, त्यामुळे त्या खोल्या ते वापरू शकत नव्हते. पाटीदारने जूनमध्येच घर रिकामे केले होते. दोन खोल्या बंद करून ठेवल्या होत्या. मी लवकरच माझे ते सामान परत घेण्यासाठी येईन, असे तो घरमालकाला फोनवरून सांगत होता.

- Advertisement -

हेही वाचा – Crime News : विलेपार्ल्यात महिलांचे हातपाय बांधून लूटमार करणार्‍या दोघांना अटक

दुसरीकडे, बलवीर राजपूत यांना त्या खोल्या हव्या होत्या म्हणून ते घरमालकाशी संपर्क साधत होते. शेवटी कंटाळून घरमालकाने कुलूप तोडून खोली वापरण्यास सांगितले. त्यानुसार, बलवीर यांनी गुरुवारी संध्याकाळी रुमचे कुलूप तोडले, तेव्हा फ्रीज सुरूच असल्याचे आढळले. निष्काळजीपणे आधीच्या भाडेकरूने रेफ्रिजरेटर सुरू ठेवला असेल, असे समजून बलवीर यांनी तो बंद केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेल्या वस्तू काढून टाकू असा विचार करून त्याने खोली बंद केली.

- Advertisement -

शुक्रवारी सकाळपासून खोलीतून असह्य दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे काही लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन फ्रीज उघडला तेव्हा एक कुजलेला मृतदेह आढळला. पिंकीचा मृतदेह चादरीत गुंडाळलेला होता. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा संजय पाटीदारचे नाव पुढे आले. मार्च 2024पासून तो कोणालाच तिथे दिसला नसल्याचे लोकांनी सांगितले. पोलिसांनी त्वरित चक्रे फिरवून पाटीदारला अटक केली.

चौकशीदरम्यान, संजय पाटीदारने या हत्येची कबुली दिली. पाटीदार प्रतिभासोबत पाच वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. उज्जैनमध्येही ते तीन वर्षे राहिले होते. पाटीदार विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. पण प्रतिभा त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती. त्याने हे शक्य नसल्याचे तिला पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रतिभा लग्नासाठी आग्रही होती. ती ऐकत नसल्याचे पाहून त्याने तिचा गळा दाबून खून केला. नंतर तिचा मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला आणि दुर्गंधी पसरू नये म्हणून तो हाय मोडवर ठेवला. त्याला गुन्ह्यात विनोद दवे याने साथ दिली. दुसऱ्या एका गुन्हेगारी प्रकरणात विनोद राजस्थानच्या तुरुंगात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. (MP Crime News : Live-in partner woman killed and body kept in fridge)

हेही वाचा – Bombay HC : वायू प्रदूषणावर काही तोडगा काढणार की हे दरवर्षी सहन करायचे…उच्च न्यायालयाने केली विचारणा

Manoj Joshi
Manoj Joshi
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -