घरElection 2023MP Election : केंद्रीय मंत्री तोमरांच्या मुलाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, विरोधक...

MP Election : केंद्रीय मंत्री तोमरांच्या मुलाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, विरोधक आक्रमक

Subscribe

भोपाळ : केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा मुलगा देवेंद्र तोमर यांचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कथित व्हिडिओमध्ये देवेंद्र तोमर 500 कोटी रुपयांची चर्चा करताना दिसत आहेत. यावेळी व्हिडिओ कॉल करणारी व्यक्ती देवेंद्र तोमर यांच्याबरोबरचे संपूर्ण संभाषण रेकॉर्ड करताना दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा यांनी हे काँग्रेसचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – मला मुख्यमंत्री करा; संभाजीराजे छत्रपतींकडून पुनरुच्चार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

- Advertisement -

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे गप्प का आहेत? तपास यंत्रणा कारवाई का करत नाहीत? असे सवाल पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रागिणी नायक यांनी केला आहे. तर, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर देवेंद्र तोमर यांचा हा दुसरा व्हिडीओ शेअर केला आहे. तोमर हे 500 कोटी रुपयांचा सौदा करताना दिसत आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयने याकडे काणाडोळा केला आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

हा व्हिडीओ खोटा असल्याचे सांगून भाजपा नेते विष्णू दत्त शर्मा म्हणाले की, काँग्रेसकडे कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे काँग्रेस फेक व्हिडीओ जारी करत आहे. निवडणुका येताच असे बनावट व्हिडीओ प्रसिद्ध केले जातात. याबाबत तक्रार करण्यात आली असून व्हिडीओचा तपास सुरू आहे. या डावपेचांनी निवडणुका जिंकता येणार नाहीत, असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला. काँग्रेसच भ्रष्टाचारात बुडाली आहे. काँग्रेस सरकारच्या 15 महिन्यांच्या काळात 281 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची अधिकृत नोंद असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – जय शाहांनी श्रीलंका क्रिकेट उद्ध्वस्त केले; माजी कर्णधाराचे गंभीर आरोप, अमित शाहांनाही धरले जबाबदार

देवेंद्र तोमर यांचा एक व्हिडीओ 5 नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी देवेंद्र तोमर यांनी मुरैनाच्या सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता आणि पोलीस अधीक्षकांकडे व्हिडीओची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनचे प्रभारी वीरेश कुशवाह यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने व्हिडीओ प्रसारित केला त्याची चौकशी केली जात आहे. ही खूप मोठी चेन असल्याने वेळ लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -