Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
HomeElection 2023MP Election : मोदींच्या मनात मध्य प्रदेश तर मतदारांच्या मनात मोदी; MP विजयाचे गणित

MP Election : मोदींच्या मनात मध्य प्रदेश तर मतदारांच्या मनात मोदी; MP विजयाचे गणित

Subscribe

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने 163 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेसला 66 जागांवरच समाधान मानावे लागले.

भोपाळ : मध्य प्रदेश निवडणुकीत भाजप विजयाचे अनेक राजकीय विश्लेषकांकडून विश्लेषण केले जात आहे. राजकीय विश्लेषकांकडून एक नव्हे तर अनेक कारणांचा पाढा वाचला आहे. असे असतानाच भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी या विजयाचे साधे आणि सोपे गणित सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याची देशभर चर्चा होत आहे. (MP Election Madhya Pradesh in Modis mind and Modi in voters mind MP Victory Math)

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने 163 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेसला 66 जागांवरच समाधान मानावे लागले. तर धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या भारत आदिवासी पार्टीने एका जागेवर विजय मिळवत सगळ्यांनाच धक्का दिला आहे. असे असतानाच भाजपचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत कॉंग्रेसचे उमेदवार संजय शुक्ला यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यांनी या विजयाचे श्रेय राष्ट्रीय नेत्यांना देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : PHOTO: राजस्थानात चर्चा फक्त सौंदर्यवती दिया कुमारींची; CM पदाच्या प्रबळ दावेदार

मोदींबद्दल काय म्हणाले विजयवर्गीय?

इंदूर विधानसभा मतदार संघातून विजय मिळवल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय हे म्हणाले की, मध्य प्रदेशमधील विजयामागे इतर कारणाबरोबरच मोदींची लोकप्रियता हेसुद्धा मोठे कारण आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात मध्य प्रदेश आहे तर मध्य प्रदेशमधील जनतेच्या मनात मोदी आहेत. त्यामुळेच हा विजय साकारता आल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा : Car Accident : कारला धडक लागताच देवगौंडांच्या सूनबाईचा राग अनावर; म्हणाल्या-बसखाली…

चौहानांची ‘लाडली’ ठरली गेमचेंजर

मध्य प्रदेश सरकारने लाडली लक्ष्मी ते लाडली बहीण ही योजना, सोबतच स्थानिक निवडणुकीमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण, कन्या विवाह, तसेच पंतप्रधानमंत्री मातृवंदन योजना योग्य पद्धतीने राबवणे, बेटी बचाव, बेटी पढाओ योजना, खरेदी विक्रीच्या व्यवहारात महिलांना 50 टक्के सूट, 35 टक्के भरती प्रक्रियेत महिलांना स्थान आदी योजना महिलांना समोर ठेऊन राबविण्यात आल्या. या सगळ्यांचा परिपाक म्हणजे भाजपला घवघवीत यश मिळाले.

मध्य प्रदेशचा निकाल

भाजप-163
कॉंग्रेस -66
BAAP-1