घरताज्या घडामोडीकुंभमेळ्यात सामील झालेले नरसिंह मंदिरचे प्रमुख महामंडलेश्वर यांचा कोरोनामुळे मृत्यू

कुंभमेळ्यात सामील झालेले नरसिंह मंदिरचे प्रमुख महामंडलेश्वर यांचा कोरोनामुळे मृत्यू

Subscribe

मध्य प्रदेशात कोरोनाचा कहर सुरू आहे. यादरम्यान जबलपुरमधील नरसिंह मंदिरचे प्रमुख महामंडलेश्वर जगतगुरु डॉक्टर स्वामी श्याम देवाचार्य महाराज यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते हरिद्वारला कुंभमेळ्यात सामिल होण्यासाठी गेले होते. कुंभमेळ्यातच स्वामी श्याम देवाचार्य यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या काळातही हरिद्वारमध्ये कुंभमेळा पार पडला. यावेळेस भाविक आणि संतांची गर्दी झाली होती. त्यामुळे आता मोठ्या संख्येने लोक दररोज कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. यादरम्यानच महामंडलेश्वर स्वामी श्याम देवाचार्य शाही स्नानसाठी हरिद्वारे गेले होते. हरिद्वारमध्येच त्यांना कोरोनाची लागण झाली. तिथून परतल्यानंतर आज त्यांचा मृत्यू झाला.

महामंडलेश्वर यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. असे असूनही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आणि त्यांचा आज निधन झाले. कुंभमेळ्यात सामील झालेले अनेक साधु संत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत ५०हून अधिक साधूंना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासांत जूना निरंजनी आणि आह्वान आखाड्याचे अनेक साधू कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. सातत्याने कोरोना रुग्णांत वाढ होत असल्यामुळे हरिद्वारमध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना चाचणी सुरू केली आहे.

- Advertisement -

यंदा कुंभमेळ्यादरम्यान १२, १४ आणि २७ एप्रिल रोजी तीन शाही स्नान होणार आहे. कुंभमेळा भारतात चार वेगवेगळ्या ठिकाणी नाशिक, हरिद्वार, प्रयागराज आणि उज्जैन येथे आयोजित करण्यात येतो. सामान्य परिस्थितीत हा कुंभ साधारण चार महिन्यांपर्यंत चालतो. यंदा मात्र कोरोनाचं सावट असल्याने या कुंभाचा कालावधी कमी करण्यात आला आहे.


हेही वाचा – कुंभमेळा कोरोनाचं सुपर स्प्रेडर ठरू शकतो; नीती आयोगाच्या सदस्याचे भाकीत

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -