घरताज्या घडामोडीकडकनाथ खा रोगप्रतिकारशक्ती वाढवा, तज्ज्ञांचं ICMRला पत्र

कडकनाथ खा रोगप्रतिकारशक्ती वाढवा, तज्ज्ञांचं ICMRला पत्र

Subscribe

कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना संसर्ग दरम्यान आणि कोरोनामुक्त झाल्यानंतर डाएटमध्ये कडकनाथ कोंबड्याचा वापर केल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते, असा दावा मध्य प्रदेशच्या झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषी विज्ञान केंद्राने केला आहे. याबाबत त्यांनी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चला (DHR) पत्र पाठवले आहे.

झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषी विज्ञान केंद्राकडून असा दावा केला आहे की, कडकनाथ कोबड्याच्या मटणामध्ये हाय प्रोटीन, व्हिटॅमिन, जिंक आणि लो फॅट मिळते. तसेच हे कोलेस्टेरॉल मुक्त आहे. अशातच पोस्ट कोरोना आणि कोरोना दरम्यान डाएट प्रोटोकॉलमध्ये सामिल केले पाहिजे, यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते. या पत्रात नॅशनल मीट रिसर्च सेंटर आणि मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या प्रती जोडल्या गेल्या आहेत. ट्विटरवर सूचना पत्रही देण्यात आले आहे. यासह दोन्ही संस्थांनी उच्च वैद्यकीय संस्थांना पत्रे आणि इतर कागदपत्रे पाठविली आहेत. कडकनाथच्या अंड्यांमध्ये मटणाप्रमाणे घटक असल्याचे सांगितले गेले आहे.

- Advertisement -

आता झाबुआ कडकनाथ कोबड्या आणि अंड्यांचा कोरोना आणि पोस्ट कोरोना रुग्णांच्या डाएटमध्ये सामील केले जाऊ शकते की नाही ते आयसीएमवर आधारित आहे. कोरोना संसर्गानंतर खूप कमजोर प्रतिकारशक्तीच्या लोकांवर याचा किती असर पडतो आहे, याच्या प्राथमिक परीक्षणानंतरच्या निकालातून समोर येऊ शकते. जर परिणाम सकारात्मक असतील, तर डाएटमध्ये कडकनाथ सामील केले जाऊ शकतात. दरम्यान कडकनाथ कोबड्यांना डाएटमध्ये सामील करण्यासाठी मध्य प्रदेशातील झाबुआ येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कडकनाथ रिसर्च सेंटर वरून ट्वीट करून आयसीएमआरला सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता आयसीएमआर यावर काय उत्तर देते याकडे सगळ्याचे लक्ष्य आहे.


हेही वाचा – Zika Virusच्या ट्रॅकिंगसाठी ६ तज्ज्ञांची टीम केरळमध्ये पाठवली

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -