घरदेश-विदेशखासदार किरण खेर यांचे मतदारांविषयी आक्षेपार्ह विधान; म्हणाल्या - "त्यांना चपलेने मारलं...

खासदार किरण खेर यांचे मतदारांविषयी आक्षेपार्ह विधान; म्हणाल्या – “त्यांना चपलेने मारलं पाहिजे”

Subscribe

अभिनेत्री आणि खासदार असलेल्या किरण खेर या त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत सापडतात. ज्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील करण्यात येते. आता पुन्हा एकदा त्यांनी मतदारांविषयी केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

अभिनेत्री आणि खासदार असलेल्या किरण खेर या त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत सापडतात. ज्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील करण्यात येते. आता पुन्हा एकदा त्यांनी मतदारांविषयी केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

चंदीगड येथील खासदार असलेल्या किरण खेर यांनी मतदारांविषयी एक आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने चर्चेत आल्या आहेत. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किरण खेर या नेहमीच नाही तर कधी तरी चर्चेत येत असतात पण ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. किरण खेर या अभिनेत्री असून त्या चंदीगड येथील खासदार देखील आहेत. जर का काम करून सुद्धा मतदारांनी आपल्याला मते दिली नाही तर याची त्यांना लाज वाटली पाहिजे, त्यांना चपलेने मारले पाहिजे, असे त्या एका कार्यक्रमात म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

चंदीगढ येथील किशनगड येथे असलेल्या दीप कॉम्प्लेक्स या भागात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार किरण खेर या उपथित राहिल्या होत्या. याचवेळी त्यांनी हे आक्षेपार्ह विधान केले. यावेळी त्या म्हणाल्या की, “जर दीप कॉम्प्लेक्समधल्या एकाही व्यक्तीने मला मत दिलं नाही, तर लाज वाटायला हवा. त्या लोकांना चपलेने मारायला हवं.”

- Advertisement -

किरण खेर यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे चंदीगडचे युवक अध्यक्ष मनोज लुबना यांनी त्यांच्या ते ट्विटरला हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून त्यांनी त्यांनी त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “किरण खेर किशनगडमध्ये येण्याची नऊ वर्षांत ही पहिलीच वेळ आहे. या नऊ वर्षात एकही विकास काम झाले नाही. आता त्यांना कोणत्याही मार्गाने मतं हवी आहेत. त्यांचा टोन पाहा, त्यांची गुंडगिरी पाहा.” दरम्यान, किरण खेर यांच्यासोबत या कार्यक्रमाला चंदीगडचे महापौर अनुप गुप्ता आणि महापालिका आयुक्त अनिंदिता मित्रा सुद्धा उपस्थित होते.


हेही वाचा – मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणाच्या प्रश्नावर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -