कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नीचं काँग्रेसकडून निलंबन, नेमकं काय आहे कारण?

Captain Amarinder Singh

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि खासदार प्रनीत कौर यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केले आहे.

काँग्रेसच्या खासदार प्रनीत कौर यांनी भाजपच्या बाजूने पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांची हकालपट्टी केली. याप्रकरणी पंजाबचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा यांनी केलेल्या तक्रारीवरून पक्षाच्या शिस्तपालन कृती समितीने प्रनीत कौर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरिंदर सिंग राजा यांनी याबाबतची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे. पंजाबमधील इतर काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनीही हेच मत मांडले आहे.

पंजाबमधील काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी कौर यांच्याबद्दल ही माहिती दिली आहे. प्रनीत कौर पंजाबच्या पटियाला येथून काँग्रेसच्या लोकसभा खासदार आहेत. कौर यांना कारणे दाखवा नोटीस बजावून, त्यांना पक्षातून बाहेर का काढू नये असा प्रश्न विचारत याचे तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

काँग्रेसच्या शिस्तपालन कृती समितीचे सदस्य सचिव तारिक अन्वर म्हणाले की, पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर राजा वारिंग आणि इतर राज्य नेत्यांच्या तक्रारींनंतर कौर यांचे निलंबन करण्यात आले आहे. तक्रारींमध्ये कौर यांच्यावर उत्तर पंजाबमध्ये भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आहे. पंजाबमधील काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनीही हाच आरोप केला आहे.


हेही वाचा : Nirmala Sitharaman Interview: कोरोनाचं संकट असतानाही आम्ही आर्थिक सुधारणा सुरूच ठेवल्यात – अर्थमंत्री निर्मला सीतारामण