MP सेक्स स्कँडल ; दोन डझनपेक्षा जास्त कॉलेज विद्यार्थीनींना बनवले शिकार

मध्य प्रदेशातील हाय प्रोफाईल सेक्स स्कँडलमध्ये १३ आयएएस अधिकारी आणि ८ माजी मंत्री पूर्णत: फसले आहेत. हे स्कँडल करणार्‍या श्वेता जैनने एसआयटीला दिलेल्या जबानीत हा खुलासा केला आहे. तसेच सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांना सेक्स स्कँडलमध्ये फसवण्यासाठी तिने दोन डझनपेक्षा जास्त कॉलेज विद्यार्थीनींना या स्कँडलचा हिस्सा बनवले. या विद्यार्थीनी लोअर मिडल क्लास कुटुंबातील आहेत. त्यांचा वापर मध्य प्रदेशचे आयएएस अधिकारी आणि नेत्यांच्या शय्यासोबतीसाठी करण्यात आला.

व्हीआयपींना हनी ट्रॅपमध्ये फसवून त्याच्याकडून सरकारी कंत्राटे मिळावची, हा या सेक्स स्कँडलचा मुख्य हेतू होता. श्वेता जैन आणि तिची मैत्रीण आरती दयाल यांनी अशी अनेक सरकारी कंत्राटे मिळवली होती. या व्यतिरिक्त त्या दोघी मध्य प्रदेशातील आयएएस आणि आयपीएस अधिकार्‍यांच्या पोस्टींगही मॅनेज करायच्या.

श्वेता जैन आणि आरती दयाल यांच्याकडे मध्य प्रदेशचे आयएएस अधिकारी आणि राजकीय नेते कॉलेज विद्यार्थीनींची मागणी करायचे. त्यामुळे या दोघींनी लोअर मिडल क्लास कॉलेज विद्यार्थीनींना आपल्या स्कँडलमध्ये फसवायच्या. त्यांना हे नेते आणि अधिकार्‍यांशी सेक्स करायला लावायच्या.

श्वेता जैनच्या सेक्स स्कँडलमध्ये फसलेल्या एका १८ वर्षांच्या तरुणीने एसआयटीला सांगितले की, तिला एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन होते होते. त्यामुळे ती श्वेताच्या संपर्कात आली. श्वेताने अ‍ॅडमिशन मिळवून देण्याचे वचन देत त्या तरुणीला सेक्स स्कँडलमध्ये फसवले. अशा अनेक तरुणींना श्वेता जैन हिने फसवल्याचे आता उघडकीस आले आहे.

हेही वाचा –

‘दिल्लीपुढे म्हणजे नेमके कुणापुढे झुकणार नाहीत शरद पवार?’