घरताज्या घडामोडीपक्षातील कोणत्याही व्यक्तीवर नाराज नाही, बंडखोरीबाबतच्या आरोपांनंतर शशी थरूरांचं स्पष्टीकरण

पक्षातील कोणत्याही व्यक्तीवर नाराज नाही, बंडखोरीबाबतच्या आरोपांनंतर शशी थरूरांचं स्पष्टीकरण

Subscribe

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यावर पक्षातील बंडखोरीबाबत होत असलेल्या आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पक्षातील कोणत्याही व्यक्तीवर मी नाराज नाहीये. तसेच मला कोणत्याही गोष्टीचा त्रासही होत नाहीये. कोणत्याही व्यक्तीशी किंवा नेत्याशी बोलायला मला काहीच हरकत नाहीये, असं शशी थरुर म्हणाले.

ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी कोची येथे गेलेल्या थरूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी पक्षातील कोणाच्याही विरोधात बोललो नाही किंवा सूचनांच्या विरोधात काम केले नाही. असे कोणाला वाटत असेल तर पुरावा सादर करा. असा वाद का निर्माण झाला? मी कोणावरही आरोप वा प्रत्यारोप केलेले नाहीत. माझ्याकडून कोणतीही तक्रार किंवा समस्या नाही. मला सगळ्यांना एकत्र पाहण्यात काही अडचण येत नाही किंवा मला कोणाशीही बोलण्यात अडचण येत नाही, असं शशी थरुर म्हणाले.

- Advertisement -

राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही डी सतीसन आणि केरळ पीसीसीच्या अध्यक्षांबाबत बोलताना थरुर म्हणाले की, त्यांची तब्येत ठीक नाहीये. त्यामुळे ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार आहेत. ते माझ्याशी बोलले तर मी उत्तर देणार नाही का? आम्ही पाळणाघरातील मुले नाही आहोत, जी क्षुल्लक गोष्टींवर एकमेकांशी बोलू किंवा बोलणे टाळू. पण जर आपण एकाच वेळी एकाच ठिकाणी नसलो तर आपण एकमेकांशी कसे बोलणार? तर सतीशन यांनी थरूर यांचे नाव न घेता अलीकडेच म्हटले होते की, पक्षात कोणत्याही सांप्रदायिकता किंवा समांतर क्रियाकलापांना परवानगी दिली जाणार नाही आणि अशा हालचालींना गांभीर्याने सामोरे जाईल असा इशारा दिला.

विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि सार्वजनिक व्यक्तींच्या भेटीसाठी काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या मलबार दौऱ्याने काँग्रेसजनांचे कान उपटले आहेत. केरळमधील काँग्रेसच्या महत्त्वाच्या गटातील काहींना तिरुअनंतपुरमच्या खासदाराच्या या निर्णयामागे अजेंडा जाणवला आहे. काँग्रेसमध्ये थरूर यांचा नवा गट उदयास येण्याची चिन्हे असून संघ परिवारावर आयोजित एका चर्चासत्रावर अघोषित बंदी लादणाऱ्या आणि धर्मनिरपेक्षतेला आव्हान देणाऱ्या नेत्याच्या विरोधात त्यांचे समर्थक उघडपणे मैदानात उतरले आहेत. आता या अटकळांना उत्तर देताना थरूर म्हणाले की, मी कोणाला घाबरत नाही आणि मला घाबरण्याची गरज नाही.

- Advertisement -

हेही वाचा : भारतीय संस्कृती आणि संगीताचे वेड जगभरातच वाढले आहे, पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -