पंतप्रधान चहा विकत होते यावर माझा विश्वास नाही, खासदार शत्रुघ्न सिन्हांची टीका

२०२४ मध्ये देशात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान कोण होऊ शकतं याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान चहा विकत होते यावर माझा विश्वास नाही, अशी टीका खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींवर केली आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, तेजस्वी यादव हे चांगलं काम करत आहेत. त्यांना राजकारणातला बराच अनुभव मिळाला आहे. त्यांच्याकडं बिहारचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपदासाठी शिक्षण महत्वाचं नाही. फक्त पाठिंबा गरजेचा आहे. पंतप्रधान चहा विकत होते यावर माझा विश्वास नाही. हा केवळ एक प्रोपोगंडा निर्माण केला जात आहे, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

नितीश कुमार हे एक यशस्वी नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी उत्कृष्ट काम केलं आहे. २०२४ साठी तुम्ही पंतप्रधानपदचा चेहरा म्हणून राहुल गांधींकडं दुर्लक्ष करु शकत नाही. कारण त्यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ही क्रांतीकारी ठरली होती, असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.


हेही वाचा : ‘कसबा हे भाजपाचे आहे, काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाच तर…’, फडणवीसांचा हल्लाबोल