घरदेश-विदेशशिंदे गटातील खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत भेटीत...

शिंदे गटातील खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत भेटीत चर्चा?

Subscribe

शिवसेनेतल्या बंडखोर खासदारांकडून वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटात सहभागी झालेल्या 12 खासदारांची स्वतंत्र गट स्थापन करण्यााबाबत लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा झाली आहे. शिंदे गटाने दिलेल्या पत्रात लोकसभा सचिवालयाने बदल सुचवले आहेत. त्यामुळे आता हे पत्र आज संध्याकाळी अथवा उद्या लोकसभा अध्यक्षांना दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

शिंदे गटातील काही शिवसेना खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीत खासदारांची संख्या आणि त्या संदर्भातल्या नियमांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. लोकसभा सचिवालयाने शिंदे गटाच्या पत्रात बदल सुचवले असून शिंदे गटाने आपले पत्र मुख्य प्रतोदांच्या नावाने द्यावे, अशी सूचना केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत हे शिंदे गटासोबत नाहीत. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांना गटनेता नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर, शिवसेनेतील प्रतोद भावना गवळी या मुख्य प्रतोद म्हणून कायम असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंकडे 6 खासदार? –

विनायक राऊत

- Advertisement -

अरविंद सावंत

राजन विचारे

गजानन कीर्तिकर

बंडु जाधव

ओमराजे निंबाळकर

उर्वरित12 खासदार शिंदे गटात –

उर्वरित 12 खासदार आता शिंदे गटामध्ये जाणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री दोन च्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करत शिंदे गटाने आपली स्वत: ची कार्यकारणी जाहीर केली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -