घरदेश-विदेशMr.India प्रेमराजचे 42व्या वर्षी निधन, बाथरुममध्ये पडलेला होता मृतदेह

Mr.India प्रेमराजचे 42व्या वर्षी निधन, बाथरुममध्ये पडलेला होता मृतदेह

Subscribe

 

राजस्थानः Mr. India च्या किताबावर आपले नाव कोरणारा राजस्थान येथील ४२ वर्षीय प्रसिद्ध बॉडी बिल्डर प्रेमराज अरोराचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. अरोराचा मृतदेह वॉशरुममध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

- Advertisement -

गुरुवारी नेहमीप्रमाणे प्रेमराज वर्कआऊट करुन आला. त्यानंतर तो वॉशरुममध्ये गेला. बराच वेळ झाला तरी वॉशरुममधून बाहेर येत नसल्याने कुटुंबीयांनी जाऊन बघितले तर प्रेमराज अरोरा तेथे बेशुद्ध अवस्थेत आढळला. तेथून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

२०१४ मध्ये प्रेमराजने Mr. India चा बहुमान पटकावला. फिटनेसची तो विशेष काळजी घेत होता. तो फिटनेस ट्रेनरही होता. तो कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करत नव्हता. केवळ डायट फॉलो करायचा, असे प्रेमराजच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

प्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचाही अशा प्रकारे मृत्यू झाला होता. १० ऑगस्ट २०२२ रोजी राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जीममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर एक्सरसाईज करत असताना त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि ते खाली पडले. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांना तत्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. राजू श्रीवास्तव पक्षातील काही मोठ्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्ली येथे आले होते. सकाळी ते जीम करण्यासाठी हॉटेलच्या जीममध्ये गेले. त्यावेळी वर्कआउट करता करता त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर ते व्हेंटीलिटरवर होते. २१ सप्टेबंर २०२२ रोजी राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. त्यामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली होती.

अशाप्रकारे वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे वर्कआऊट करताना कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करु नये. तसेच जेवावर बेतेल असा वर्कआऊट करु नये, असा सल्ला डॉक्टर वारंवार देत असतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -