कोरोनाविरोधी mRNA अमेरिकन लस करते कर्करोगापासून संरक्षण, जाणून घ्या लशीची उपयुक्तता

After recovering corona white fungus blister was found brain patient in Hyderabad
कोरोनामुक्त रुग्णाच्या मेंदूत आढळला व्हाइट फंगसचा फोड, हैदराबादमधील घटना

अमेरिकन सरकारने ९/११ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर mRNA लसीचे तंत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला. परंतु ही लस आता कोरोनाविरोधातही अधिक प्रभावी ठरत आहे. अमेरिकेवरील एंथ्रेक्स हल्ल्यात सैन्यावर विषाणूजन्य हल्ला होण्याची भीती अमेरिकन सरकारला होती. त्यामुळे पेंटागॉनच्या डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्स एजेंसीने (DPRA) मॉर्डना कंपनीला RNA बेस्ड लस विकसित करण्याचे कंत्राट दिले. मात्र  आज mRNA तंत्रावर आधारित ही लस कोरोनानंतर कर्करोगाविरोधात वापरली जात आहे. जर्मन बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोएनटेकने जूनमध्ये जाहीर केले की, mRNA तंत्रज्ञावर आधारित आणि कॅन्सवर उपचार करणाऱ्या BNT111 लसीचे फेज-२ मधील ट्रायल कॅन्सरच्या रुग्णावर झाली आहे.

कर्करोगाचा समूळ नष्ट करणार mRNA लस?

स्पाइक्स प्रोटीन कोरोना विषाणूच्या म्यूटेशनला शरीरातील रोगप्रतिकार शक्ती ओळखते आणि त्याविरोधात अँटीबॉडी तयार करण्यास सुरुवात करते. यात messenger RNA म्हणजेच mRNA लस शरीरात स्पाइक्स प्रोटीनविरोधात प्रथिने तयार करण्यास मदत करते. याचा अर्थ असा भविष्यात कोरोना संसर्ग झाल्यास mRNA लसीमुळे कोरोना विषाणूला संरक्षण पेशी मारतील. त्याचप्रमाणे mRNA लस कर्करोगग्रस्त रुग्णाच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशींनी ओळखत रोगप्रतिशक्तीच्या जोरावर त्या पेशींना नष्ट करण्याचा प्रयत्न करेल.

कर्करोगाचा सर्वाधिक धोका असणाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक लस बनवणे शक्य

कर्करोगाच्या प्रकारानुसार त्यावर प्रतिबंधात्मक लस तयार करणे शक्य आहे. जसे की ब्रेस्ट कॅन्सरवर. ह्यूस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलमधील कॅन्सर बायोलॉजिस्टची एक टीम कॅन्सरचा सर्वाधिक धोका असणाऱ्यांसाठी प्रिवेंटेटिव कॅन्सर लस विकसित करीत आहे. उदाहरणार्थ, BRCA2 म्यूटेशन असलेल्या लोकांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशा लोकांसाठी ही लस फायदेशीर ठरेल.

‘या’ प्रकारच्या कर्करोगावर लस सहज उपलब्ध होऊ शकतात.

तोंडात घशाच्या मागच्या भागास होणारा कर्करोग (ऑरोफरिंजियल कॅन्सर)

गर्भाशयाचा कर्करोग (सवाईकल कॅन्सर)

ब्रेस्ट कॅन्सर

लिवर कॅन्सर

प्रोस्टेट कॅन्सर

विविध प्रकारचे ट्यूमर

बायो एनटेकने  कॅन्सरच्या चार प्रकारांच्या स्पेसिफिक एंटीजनचा केला वापर

मेलेनोमासारख्या काही कर्करोगामुळे शरीरात होणारे बदल सहज ओळखता येतात. बायोएनटेकने हाच दृष्टिकोन वापरला आहे. यात कॅन्सरच्या चार प्रकारांच्या स्पेसिफिक एंटीजनची ओळख केली आहे. यात ९० टक्क्यांहून अधिक मेलेनोमा पीडित लोकांमध्ये यातील कमीत कमी एक एंटीजन आढळला आहे.

कर्करोगामुळे एका वर्षात एक कोटी रुग्णांचा बळी

कर्करोग हा जगभरात मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २०२० मध्ये कर्करोगामुळे सुमारे १० कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला.

कर्करोगावर लस बनवणे कठीण
हार्वर्ड दाना कॅन्सर इन्स्टिट्यूटचे फिजीशीयन आणि शास्त्रज्ञ डेव्हिड बारुन सांगतात की, अनेक प्रकारच्या कर्करोगाविरोधात लस तयार करणे खूप कठीण काम आहे. कारण प्रत्येक प्रकारच्या कर्करोगाची लक्षणे आणि समस्या भिन्न आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकार ओळखत लसीवर काम करणे अवघड आहे.