घरदेश-विदेशमोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सर्वाधिक कर्ज नारायण राणेंच्या डोक्यावर; ADR चा अहवाल

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सर्वाधिक कर्ज नारायण राणेंच्या डोक्यावर; ADR चा अहवाल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा काही दिवसांपूर्वीच विस्तार झाला. ४३ नव्या मंत्र्यांनी ७ जुलैला मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळाची संख्या ही ७८ झाली आहे. दरम्यान, या मंत्र्यांबाबत असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये १ कोटी रुपयांहून अधिक कर्ज असलेले १६ मंत्री आहेत. यामध्ये खासदार नारायण राणे पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ADR च्या अहवालातून समोर आली आहे.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR ही निवडणूक हक्क संस्था आहे. निवडणूक लढवाना उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही संस्था अहवाल प्रकाशित करत असते. ADR च्या अहवालात उमेदवाराची संपत्ती, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि इतर गोष्टींची देखील माहिती आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ADR ने मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील नेत्यांसंदर्भातील अहवाल सादर केला आहे. या नव्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांवर १ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे. या यादीमध्ये खासादर नारायण राणे, पीयुष गोयल आणि कृष्ण हे पहिल्या तीनमध्ये आहेत. यात नारायण राणे हे सर्वाधिक कर्ज डोक्यावर असलेले मंत्री ठरले आहेत. त्यांच्यावर ३० कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे.

- Advertisement -

श्रीमंत मंत्र्यांमध्ये राणे तिसऱ्या क्रमांकावर

नव्या मंत्रिमंडळात सर्वात श्रीमंत मंत्र्यांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे पहिल्या स्थानावर आहेत. तर नारायण राणे या यादित तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्यांची सरासरी संपत्ती १६.२४ कोटी रुपये आहे. ज्योतिरादित्य शिंदे, गोयल, राणे आणि राजीव चंद्रशेखर या चार मंत्र्यांची संपत्ती ५० कोटी रुपयांहून अधिक आहे. नारायण राणे यांची संपत्ती ८७ कोटी रुपये इतकी आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -