Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Mucormycosis: आता १०० पटीने स्वत होणार ब्लॅक फंगसवरील उपचार! डॉक्टरांकडून नव्या पद्धतीचा...

Mucormycosis: आता १०० पटीने स्वत होणार ब्लॅक फंगसवरील उपचार! डॉक्टरांकडून नव्या पद्धतीचा शोध

Related Story

- Advertisement -

राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने सर्वसामान्य लोकं चिंतेत आहे. देशाला कोरोनाबरोबरच काळ्या बुरशीमुळे मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना करावा लागत आहे. देशात काळ्या बुरशीचा संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, परंतु काळ्या बुरशीच्या उपचाराचा खर्च १०० पट कमी करण्यात डॉक्टरांना यश आल्याचे सांगितले जात आहे. कोरोना आणि काळ्या बुरशीच्या दुहेरी समस्येमुळे, बऱ्याच रूग्णांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अशा परिस्थितीत उपचार खर्च कमी झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

काळ्या बुरशीच्या उपचारासाठी आतापर्यंत साधारण ३५ हजार रुपये खर्च येत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याच्या रूग्णाला अँटी फंगल इंजेक्शन्सची आवश्यकता असते आणि ज्याची किंमत खूप महाग आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आता शल्यचिकित्सक म्युकरमायकोसिसच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी अशी पद्धत घेऊन आले आहेत, ज्यामुळे त्याची किंमत १०० पटीपर्यंत स्वस्त होऊ शकते. म्हणजेच आता एका दिवसाच्या उपचारांचा खर्च ३५ हजार रुपयांवरून केवळ ३५० रुपयांवर येऊ शकतो.

असे होणार उपचार

- Advertisement -

डॉक्टर जी नवी उपचार पद्धती घेऊन आले आहेत, त्यामध्ये फक्त रूग्णाच्या रक्तातील क्रिएटिनाईन (Blood Creatinine) पातळीचे अत्यंत काळजीपूर्वक परीक्षण केले पाहिजे. क्रिएटिनाईनची पातळी वाढल्यास, रुग्णाला परीक्षण केलेल्या वेळेसह औषध द्यावे लागेल. या पद्धतीने रूग्णावर उपचार खर्च कमी केला जाणार आहे. काळ्या बुरशीच्या उपचारामध्ये वापरल्या जाणार्‍या इंजेक्शनचे नाव अ‍ॅम्फोटेरेसिन असून काळ्या बुरशीचे वाढते प्रकरण लक्षात घेता या इंजेक्शनची कमतरता बाजारात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत उपचारांच्या इतर पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे.


- Advertisement -