Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE mucormycosis : कोरोना उपचारानंतर बुरशी वेगाने पसरतानाच आता रंगही बदलतेय

mucormycosis : कोरोना उपचारानंतर बुरशी वेगाने पसरतानाच आता रंगही बदलतेय

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना विषाणुच्या संकटानंतर आता ब्लॅक फंगस इंफेक्शनचे प्रमाण वेगाने वाढत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या बहुतेक रुग्णांना वेगवेगळ्या रंगाच्या बुरशीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. काळ्या, पांढर्‍या आणि पिवळ्या बुरशीच्या संसर्गाननंतर आता मध्य प्रदेशातील जबलपूर येथील नेताजी सुभाष चंद्र बोस मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना रूग्णांत क्रीम रंगाची बुरशी सापडल्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. परंतु एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आधीच सांगितले आहे की, बुरशीच्या बदलत्या रंगामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.

बुरशीची तीव्रता त्याच्या रंगानुसार निश्चित केली जात नाही.

बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसीच्या न्यूरोलॉजी, वैद्यकीय विज्ञान संस्था, प्राध्यापक विजयनाथ मिश्रा यांनी स्पष्ट केले की, बुरशी संसर्ग स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि पसरविण्यासाठी रंगात बदल करते. परंतु बुरशीची तीव्रता त्याच्या रंगानुसार निश्चित केली जात नाही. बर्‍याच प्रकारच्या बुरशी विविध प्रकारचे रंग निर्माण करत असतात. यात गुलाबी, लाल, नारिंगी, पिवळा, हिरवा आणि राखाडी अशा इतर रंगांमध्ये विविध प्रकारचे रंग आढळतात.

- Advertisement -

परंतु या बुरशीचा रंग सूर्याच्या प्रखर प्रकाशाने आणखी हलका होऊ शकतो. तर पावसामुळे तो रंग धुतलाही जाऊ शकतो. सामान्य परिस्थितीत कोणत्याही प्रकरच्या बुरशीमध्ये स्वतःचे गट विकसित करण्याची क्षमता असते. एकदा त्यांचा गट पूर्णपणे विकसित झाला की कोणत्याही परिस्थिती स्वत:ते अस्तित्व टिकण्यासाठी बुरशीला पुरेसे पोषक तत्वे न मिळाल्यास तिच्यातील मायसीलियम (प्रजनन संरचना) हा भाग जिवंत राहण्यासाठी आणि प्रसरणासाठी स्वतःमध्ये काही बदल घडवून आणते. या स्थितीत, बुरशी नवीन कलोनी सोडत काही भिन्न पदार्थ तयार करण्यास सुरुवात करते यामुळे रंगात बदल होतात.

बुरशी रंगात कसा बदल करते ?

डॉ. विजयनाथ मिश्रा यांनी सांगितले की, बुरशीच्या आत कॅरोटीनोयड्स असा घटक असतो. यामुळे बुरशीच्या रंगात बदल होण्यास मदत मिळते. तीन प्रकारचे कॅरोटीनोयड्स असतात. प्रथम बीटा कॅरोटीन (केशरी), गामा कॅरोटीन (केशरी-लाल), अल्फा कॅरोटीन (केशरी-पिवळा) आहे. हे रंग तीव्र उन्हात आणि इतर प्रतिकूल परिस्थितीत बुरशीचे संरक्षक कवच म्हणून कार्य करतात. यामुळे शरीरात बुरशी संसर्गाचे प्रमाण वाढते.

रंगहीन बुरशी उन्हात मरतात

- Advertisement -

डॉ. मिश्रा सांगतात, बुरशीमध्ये दिसणारा रंग त्याच्या बाह्य आवरण म्हणजे कोशिकांच्या द्रवात जमा आहे. म्हणून असे म्हणता येईल की, रंगीत बुरशी रंगहीन बुरशीपेक्षा कमी प्राणघातक आणि आक्रमक असते. कारण रंगीत बुरशीला जाड बाह्य आवरण असते ज्यामुळे ते मरत नाहीत. रंगहीन बुरशी सूर्यप्रकाशामध्ये मरतात परंतु रंगीत बुरशी सूर्यप्रकाशामुळे मरत नाही.

वाढत्या दाबानंतरही बदलतो रंग

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोना साथीच्या काळात लोक अँटीबॉडीसचा अधिक वापर करतायत. यामुळे खराब बॅक्टेरियांसह निरोगी बॅक्टेरियांचाही नाश होत आहे. अशा परिस्थितीत शरीरातील कमकुवत प्रतिकारशक्तीचा फायदा घेत बुरशी संसर्ग शरीरावर आक्रमण करते. शरीरात आधीपासूनच असलेल्या अनेक औषधांचा प्रभावापासून वाचण्यासाठी बुरशी देखील त्याचा रंगात बदल करते. परिणामी सध्या कोरोना संसर्गानंतर रुग्णांमध्ये विविध प्रकारच्या बुरशीचा संसर्ग होत आहे.

सर्व रंगाच्या बुरशीवर उपचार समान

डॉ. मिश्रा स्पष्ट करतात की, बुरशी संसर्गाचा रंग कोणताही असला तरी त्याच्यावरील उपचाराची पद्धत सहसा एकसारखीच असते. यात एम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनसह इतर अँटीफंगल औषधांचा समावेश आहे. औषधांचा डोस बुरशी संसर्गाच्या स्थितीवर आणि संक्रमणाच्या परिणामावर अवलंबून असतो. परंतु हे लक्षात ठेवा की, घरच्या घरी बुरशीजन्य संसर्गावर अजिबात उपचार करु नका. यात सौम्य लक्षणे जाणवत असतील तरी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.


बदलापुरात गॅस गळतीने उडाली खळबळ, तर भिवंडीत भीषण आगीच्या घटनेत १५ गोदाम खाक


 

- Advertisement -