घरदेश-विदेश'मुझे चलते जाना है...' भाजपने अॅनिमेटेड व्हिडिओद्वारे दाखवले 2024 चे लक्ष्य

‘मुझे चलते जाना है…’ भाजपने अॅनिमेटेड व्हिडिओद्वारे दाखवले 2024 चे लक्ष्य

Subscribe

नवी दिल्ली : मिशन 2024 साठी भाजपने तयारी सुरू केली असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अॅनिमेटेड व्हिडिओद्वारे आपल्या योजनेची झलक दाखवताना आपले लक्ष्य सांगितले आहे. या अॅनिमेटेड व्हिडिओचे शीर्षक ‘मुझे चलते जाना है…’, असे आहे.

साडेचार मिनिटांच्या अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात केलेल्या कामांची झलक दाखवताना विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कसे टार्गेट केले हेही दाखवण्यात आले आहे. 2014 मध्ये गुजरातेच मुख्यमंत्री आणि 2019 मध्ये भारताचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास कसा होता, हेही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

- Advertisement -

व्हिडिओच्या सुरुवातीला 2007 गुजरात मुख्यमंत्री असे लिहिले असून पायऱ्या दिसत आहेत. यानंतर मोदी समोरच्या पायऱ्या चढायला सुरूवात करतात. पायऱ्या चढताना सोनिया गांधी दिसतात. त्या यमराजाकडे बोट दाखवतात. यमराज एका म्हशीवर बसला असून या म्हशीवर मृत्यूचा व्यापारी असा उल्लखे केला आहे. मोदी हे बघून पुढे निघून जातात. त्यांना पुढे मणिशंकर अय्यर सोनिया गांधींसोबत चहाची किटली घेऊन उभे राहिलेले दिसतात. ते ‘चाय-चाय’ म्हणत मोदींकडे हसताना दिसत आहेत. मोदी हे बघून पुन्हा पुढे जातात. त्यांना मणिशंकर अय्यर आणि सोनिया गांधी रेल्वेच्या खिडकीतून चहाची किटली घेऊन पुन्हा ‘चाय-चाय’ म्हणत मोदींकडे हसतात, तेव्हा मोदी किटली हातात घेतात आणि हसत निघून जातात.

सोनिया गांधी बराक ओबामांसोबत मोदींना युएसए व्हीसा रिजेक्ट झाल्याचे दाखवतात. मोदी पुन्हा हसत निघून जाताना त्यांना मल्लिकार्जुन खर्गे १०० सर वाला रावण असे पोस्टर घेऊन मोदींना दाखवतात. मात्र मोदी न खांबता पुढे जातात आणि २०१४ च्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत पोहचतात आणि हात जोडून धन्यवाद करतात. यानंतर बराक ओबामा मोदींकडे धावात जातात आणि ‘अमेरिकेचे आमंत्रण’ देऊन त्यांचे स्वागत करतात.

- Advertisement -

पंतप्रधान झाल्यानंतर आजपर्यंतच्या कामगिरीचे वर्णन
या अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये पंतप्रधान ‘स्वच्छ भारत मिशन’, ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’, ‘उज्ज्वला योजना’, ‘जन धन योजना’, ‘जीवन ज्योती विमा योजना’, ‘प्रधानमंत्री गृहनिर्माण योजना’, ‘पीक विमा’ हे सार्वजनिक कार्यक्रम दाखवले आहेत.
2019 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेलवरील केलेले आरोप निष्फळ असल्याचे दाखवण्यात आले आहेत. आपल्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी कोविड महामारीचा सामना करण्यासाठी फायझर आणि मॉडर्ना सारख्या यूएस-निर्मित लसींवर ‘भारतीय लस’ निवडून या संकटावर मात केल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये काँग्रेस नेत्यांनी मोदींना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, परंतु मोदी पुढे चालत राहिले. व्हिडिओच्या शेवटी 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -