घरदेश-विदेशमुकेश अंबानी झाले आजोबा, मुलगी ईशाला झाले जुळे

मुकेश अंबानी झाले आजोबा, मुलगी ईशाला झाले जुळे

Subscribe

रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानीती मुलगी ईशा अंबानीने शनिवारी जुळ्या मुलांना जन्म दिला. ईशा रिलायंस रिटेलचा व्यवसाय सांभाळते. तिचं लग्न आनंद पीरामलसोबत झाले असून ईशा आणि आनंदच्या मुलीचे नाव आदिया आणि मुलाचं नाव कृष्णा ठेवलं आहे. अंबानी आणि पीरामल कुटुंबियांनी दुपारी मीडिया समोर माहिती दिली आहे.

4 वर्षांपूर्वी झाले होते लग्न
ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचे लग्न चार वर्षांपूर्वी मुंबईमध्ये झाले होते. मुकेश अंबानींच्या कुटुंबामध्ये आता तीन लहान मुलं आहेत. त्यांच्या मुलगा आकाशला देखील एक मुलगा आहे ज्याचे नाव पृथ्वी आहे.

- Advertisement -

ईशाचा पती आनंद पीरामल एक व्यवसायिक आहे. तो पीरामल एंटरप्राइजेजचा मालक अजय पीरामल आणि स्वाती पीरामल .यांचा मुलगा आहे. त्याने यूनिवर्सिटी ऑफ पेनसिल्वेनिया मधून इकोनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. तसेच त्याने हॉर्वर्ड बिजनेस स्कूलमधून बिजनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स पूर्ण केले आहे. सध्या तो पीरामल ग्रुपचा एग्जीक्यूटिव डायरेक्टर आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

NDA प्रवेश परीक्षेत औरंगाबादची अनुष्का अनिल बोर्डे द्वितीय

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -