Reliance Industries : ‘रिलायन्स’ ठरली 100 अब्ज डॉलर कमावणारी पहिली भारतीय कंपनी

रिलायन्सच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी 100 अब्ज डॉलर कमावणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. 2021-22 वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजला 20 टक्क्यांहून अधिक नफा मिळाला आहे.

life threat to ambani family in call to reliance foundation hospital in mumbai

रिलायन्सच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी 100 अब्ज डॉलर कमावणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. 2021-22 वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजला 20 टक्क्यांहून अधिक नफा मिळाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 22.5 टक्के एकत्रित निव्वळ नफा 16,203 कोटी रुपये कमावला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या अहवालानुसार, तेल शुद्धीकरण मार्जिन, दूरसंचार आणि डिजिटल सेवांमध्ये सातत्याने झालेली वाढ आणि किरकोळ व्यवसायातील चांगली गती यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. तेल ते दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला 2020-21 या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत 13,227 कोटी रुपयांचा एकुण निव्वळ नफा झाला आहे. याआधी रिलायन्सने बाजार भांडवलात 19 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा झालेला निव्वळ नफा 60,705 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच रिलायन्सच्या उत्पनांतही मोठी वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे उत्पन्न वाढून 7.92 लाख कोटी रुपये (102 अब्ज डॉलर) झाले आहे. यासह रिलायन्स इंडस्ट्रीज ही वार्षिक 100 अब्ज डॉलर उत्पन्न मिळवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

याआधी खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स कंपनीने इतिहास रचला. रिलायन्स कंपनीचे बाजार मूल्य 19 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले. हा ऐतिहासिक टप्पा गाठणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी ठरली. शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर 20 रुपयांच्या घसरणीसह उघडला होता. मात्र, त्यानंतर शेअर बाजारात खरेदीचा जोर वाढला. रिलालन्सचा शेअर 2826 रुपयांवर पोहचला. या दरम्यानच रिलायन्स इंडस्ट्रीने 19 लाख कोटींच्या बाजार मूल्याचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी ठरली होती.


हेही वाचा – नागपुरच्या उमरेड मार्गावर भीषण अपघात; कार ट्रकच्या धडकेत सात जणांचा मृत्यू