घरताज्या घडामोडीमाझी केंद्रीय सुरक्षा व्यवस्था परत घ्या, तृणमूलमध्ये घरवापसी केल्यावर मुकुल रॉय यांचे...

माझी केंद्रीय सुरक्षा व्यवस्था परत घ्या, तृणमूलमध्ये घरवापसी केल्यावर मुकुल रॉय यांचे केंद्राला पत्र

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या परिस्थितीमध्ये कोणीही भाजपमध्ये राहणार नाही

भाजपला रामराम करत मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुकुल रॉय यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून आपली केंद्रीय सुरक्षा व्यवस्था परत घ्यावी अशी विनंती केली आहे. भाजपमध्ये असताना मुकुल रॉय यांना केंद्रीय सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. परंतु आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. यामुळे रॉय यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सुरक्षा व्यवस्था परत घेण्याची विनंती केली. मुकुल रॉय यांनी लिहिलेल्या पत्राला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही आहे.

मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बॅनर्जी सरकारने त्यांना राज्य स्तरावरील सुरक्षा व्यवस्था प्रदान केली आहे. केंद्र सरकारने मुकुल रॉय यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे.  मुकुल रॉय यांनी टीएमसीला रामराम करत ४ वर्षांपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता १ दिवसांपुर्वी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच मुलगा शुभ्रांशु यांनी देखील टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे.

- Advertisement -

बंगाल ममता बॅनर्जींचा आहे आणि राहणार

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर मुकुल रॉय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रॉय यांनी म्हटले आहे की, बंगाल पुन्हा पहिल्या स्थितीत येत आहे. बंगाल ममता बॅनर्जी यांचा आहे आणि राहणार असे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या परिस्थितीमध्ये कोणीही भाजपमध्ये राहणार नाही. भाजपला सोडल्यामुळे आता चांगलं वाटत आहे. तसेच ममता बॅनर्जी ह्या मोठ्या नेत्या आहेत. मागील काही दिवसांपासून रॉय यांची भाजपसोबतची नाराजी वाढली होती. टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी रॉय यांची पत्नी रुग्णालयात असताना भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अखेर रॉय यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. मुकुल रॉय हे पुर्वी तृणमूल काँग्रेसचे महासचिव होते परंतु आता अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव करण्यात आले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -