मुलायमसिंह यादव यांची प्रकृती खालावली, मेदांता रुग्णालयात केलं दाखल

मुलायमसिंह यादव हे ८१ वर्षांचे आहेत. मुलायम सिंह यांनी २१ दिवसांपुर्वी कोरोना लसीचा डोस घेतला होता

Mulayam Singh Yadav admitted to Medanta Hospital
मुलायमसिंह यादव यांची प्रकृती खालावली, मेदांता रुग्णालयात केलं दाखल

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची प्रकृती अचानक खालावली असल्यामुळे त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलायमसिंह यादव हे ८१ वर्षांचे आहेत. मुलायम सिंह यांनी २१ दिवसांपुर्वी कोरोना लसीचा डोस घेतला होता. मुलायम सिंह यादव यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले आहे. प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु डॉक्टरांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलायमसिंह यांच्या तब्येतीबाबत अखिलेश यादव यांच्याकडून माहिती घेतली आहे.

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यांना काही आजाराची लागण देखील झाली आहे. मागील वर्षी त्यांना मूत्रपिंडाच्या आजारामुळे रुग्णालायत दाखल कऱण्यात आले होते. तसेच ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण देखील झाले होती. आता २१ दिवसांपुर्वीच त्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. गुरुवारी सकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुलायम सिंह यांना पोटासंबंधित विकाराचा त्रास होत असल्यामुळे मागील काही दिवसांत अनेकवेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून आरोग्यासंबंधित चाचणी करण्यात आली आहे. मुलायम सिंह यांचे वय झाले असल्यामुळे सतत आजारी असतात.

मुलायम सिंह हे वयोवृद्ध झाले असल्यामुळे सध्या ते राजकारणात सक्रीय नसतात परंतु पक्षातील कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतात. मुलायम सिंह हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली आहे.

निवडणुकीची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ ची जबाबदारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर आली आहे. अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे की, सपाने केलेल्या विकासकामांच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणूकीत ३५१ जागांवर विजय निश्चित होईल असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला आहे. कोरोना काळात आलेल्या अपयशामुळे भाजपला कमी जागा मिळण्याच्या शक्यता आहे परंतु भाजपकडून चांगले प्रदर्शन होईल असे वक्तव्य करण्यात येत आहे.