Multibagger Stock Tips: अवघ्या १८ महिन्यात गुंतवणूकदाराच्या १ लाखाचे झाले १.०६ कोटी रुपये; जाणून घ्या कसे?

multibagger penny stock 1 lakh turns in 1 crore only in 16 months simplex papers share price
Multibagger Stock Tips: अवघ्या १८ महिन्यात गुंतवणूकदाराच्या १ लाखाचे झाले १.०६ कोटी रुपये; जाणून घ्या कसे?

२०२१ वर्षात अनेक मल्टीबॅगर शेअर्समुळे (Multibagger shares) गुंतवणुकदारांचा बंपर फायदा झाला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकच्या बाबत सांगणार आहोत, ज्यामुळे गुंतवणूदाराला जवळपास दीड वर्षात १०६ पट रिटर्न मिळाले आहेत. सिम्प्लेस पेपर्स (Simplex Papers shares) एक असा शेअर आहे, ज्यामुळे गुंतवणूकदाराच्या १ लाखाचे रुपांतर १ कोटीत झाले आहे. हा शेअर ३१ जुलै २०२० ला ०.५४ रुपयात फक्त बंद झाला होता. तर आज या स्टॉकची किंमत ५७.३५ रुपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. जाणून या शेअरबाबत सर्व काही….

५ दिवसात २२.३० टक्क्यांनी वाढला शेअर

गेल्या ५ ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांनी त्यांच्या शेअरधारकांना २१.५० टक्के रिटर्न दिले आहे. गेल्या १ महिन्यात मल्टीबॅगर पेनी स्टॉक रुपये २२.३० प्रति शेअर लेवलहून वाढून रुपये ५७.३५च्या लेवलचा पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीने गुंतवणूकदारांना १.५५ टक्के रिटर्न दिले आहेत. तर गेल्या महिन्यात हा अलफा स्टॉक रुपये २.८७च्या स्तरावरून वाढून रुपये ५७.३५च्या लेवलचा पोहोचला आहे. या कालावधीत शेअरने जवळपास १९०० टक्के रिटर्न दिले आहेत.

०.५४ हून ५७.३५ रुपये झाला शेअर

गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर स्टॉक ०.८४ हून ५७.३५ लेवलवर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरमध्ये जवळपास ६७०० टक्के वाढ दिसून आली. तर गेल्या १८ महिन्यात हा पेनी स्टॉक ०.५४ हून ५७.३७ रुपये लेवलवर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने गुंतवणुकदारांना १०५०० टक्क्यांचा रिटर्न दिला होता.

सिम्प्लेस पेपर्स शेअर्समध्ये जर कोणी गुंतवणुकदाराने एक आठवड्यापूर्वी १ लाख रुपये लावले असते तर आज त्याचे एक लाख रुपये १.२१ लाख बनले असते. तसेच जर कोणत्या गुंतवणुकदाराने या शेअरमध्ये एक महिन्यापूर्वी एक लाख लावले असते तर त्याला २.५५ लाखाचा नफा झाला असता. याशिवाय जर सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवणुक केली असती तर १ लाखाचे आज २० लाख झाले असते.


हेही वाचा – १ जानेवारीपासून ATM मधून पैसे काढल्यास ग्राहकांना बसणार मोठा फटका, RBIने जारी केली नियमावली