घरदेश-विदेशआता मुंबई विमानतळावर बोर्डिंग पासवर स्टॅम्पची गरज नाही

आता मुंबई विमानतळावर बोर्डिंग पासवर स्टॅम्पची गरज नाही

Subscribe

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बोर्डिग पासवर स्टॅम्प लावण्याची सक्ती आता उठवली गेली आहे. अशा प्रकारची बंदी उठवणारे मुंबई विमानतळ हे पहिलेच विमानतळ ठरले आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावर आता प्रवाशांना बोर्डिंग पासवर स्टॅम्प घेणे सक्तिचे नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारे मुंबई विमानतळ हे पहिलेच विमानतळ ठरले आहे. हा नियम विमानतळाच्या टर्मिनल २ (टी-२) वरून उडणारे देशांतर्गत विमानांसाठी घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. हा निर्णय लागू झाल्यानंतर प्रवाशांना आपल्या बोर्डिंग पासवर स्टॅम्पघेणे बंधनकारक नसणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने सोमवारी याची घोषणा केली. या सुविधेला “डीजी यात्रा” असे म्हणतात. प्रवाशांना ही सुविधा देण्यासाठी नागरी हवाई सुरक्षा विभागाने (ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी) आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय यांच्यावतीने पाठपुरवठा करण्यात आला होता. यात्रे दरम्यान प्रवाशांना अधिक कागदपत्र बाळगावे लागणार नाही यासाठी ही सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार टी-२ मधून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आपल्या मोबाईल फोनच्या सहाय्याने ई-गेट रीडरमध्ये बारकोड किंवा क्यूआर कोडचा वापर करुन प्रवेश मिळणार आहे.

व्यस्त विमानतळ

मुंबई विमानतळ हे एक व्यस्त विमानतळ आहे. या विमातळावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने प्रवाशांची वाहतूक करतात. २०१६-१७ मध्ये मुंबई विमानतळावरून दररोज ८३७ विमाने उडत टेक ऑफ करत होती. याचाच अर्थ ६५ सेंकदात एका विमानाने उड्डाण घेतले. २०१६-१७ मध्ये मुंबई विमानतळावरून ४.५२ कोटी प्रवाशांनी प्रवास केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -