मुंबई एअरपोर्टवर फ्लाईट ऑन टाइम ,दिल्ली आणि बंगळूरला टाकले मागे

mumbai airport tops punctuality he left delhi and bangalore behind
वक्तशीरपणात मुंबई विमानतळ देशात अव्वल, पण याचे महत्त्व काय?

वक्तशीरपणात मुंबई विमानतळ देशात अव्वल ठरले आहे. तब्बल ९८ टक्के विमान उड्डाण वेळेत पूर्ण करीत मुंबई विमानतळाने दिल्ली आणि बंगळुरमधील विमानतळांना मागे टाकले आहे. जगातील फार थोडे विमानतळे आहेत ज्यात प्रवाशांना अधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतात. यातील मुंबई विमानतळ एक आहे. जगातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीतही मुंबई विमानतळाचा पहिला क्रमांक लागतो. दररोज शेकडो विमानांची ये-जा आणि प्रवाशांच्या गर्दीमुळे या विमानतळ रात्रंदिवस गजबज असते. असे असतानाही या विमानतळावरील स्वच्छता आणि नीटननेटकेपणा वाखाणण्याजोगा आहे.

मुंबई विमाळतळावर दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना छेदत असल्याने एका वेळी दोन विमानांचे उड्डाण करता येत नाही. याचा विमान संचलनावर परिणाम होतो. त्यामुळे एका धावपट्टीवर विमानाचे आगमन वा उड्डाण प्रक्रिया सुरु असताना दुसरी धावपट्टी बंद ठेवावी लागते. अशाने पीक अवरमध्ये मुंबई विमानतळाचे वेळापत्रक कोलमडते. मात्र या अडथळ्यांवर मात करुन मुंबई विमानतळ वक्तशीरपणात अव्वल स्थानी पोहचले आहे. एटीसी टॉवरमधील कर्मचाऱ्यांच्या मेहनत आणि समयसूचकतेमुळे हे साध्य झाले आहे. देशांतर्गच विमान सेवा देणाऱ्या सहा आघाडीच्या विमान कंपन्यांच्या मे महिन्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून नागरी उड्डाण वाहतूक महासंचालनालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

यात दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि हैदराबाद या विमानतळांवरील विमान उड्डाण वेळांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सहापैकी चार विमान कंपन्यांनी मुंबई विमानतळाला वक्तशीरपणात पहिला क्रमांक दिला आहे. मुंबई विमानतळावर मे महिन्यात एअर एशिया आणि विस्ताराच्या विमानांचे वेळापत्रक १०० टक्के अचूकरित्या पाळले होते. तर इंडिगो ९९. ३० टक्के, गो एअर ९४.२० टक्के, स्पाईस जेट ९५.८० टक्के आणि एअर इंडिया विमानांनी ९५.७० टक्के वेळीची अचूकता पाळली आहे.

यापूर्वीही मुंबई विमान तळाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव कमावले आहे. मुंबई विमानतळ अर्थात छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चेक-इन सुविधा, सुरक्षा, विमानतळ टर्मिनलवरील सुविधा, खानपान सेवा अशा आठ विविध सेवा यापूर्वीच अव्वल दर्जाच्या ठरल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या एकूण भौगोलिक विकासासाठी ही कुठेतरी चांगली बाब ठरत आहे.


सोयीसुविधांच्या बाबत मुंबई विमानतळ ठरले अव्वल