अकासा एअरच्या फ्लाइटमध्ये जळाल्याचा वास; विमान पुन्हा मुंबई एअरपोर्टवर परतले

mumbai bangalore bound akasa air flight returns to mumbai airport after burning smell in cabin

मुंबईहून बेंगळुरुला जाणाऱ्या अकासा एअर कंपनीच्या विमानाच्या केबिनमधून अचानक जळल्याचा वास आल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे विमान पुन्हा मुंबई एअरपोर्टवर परतले आहे. दरम्यान नंतर समजले की, विमानाला पक्षी आदळल्याने हा वास येत होता.

अकासा एअरने यावर्षी 7 ऑगस्ट रोजी आपली पहिली सेवा सुरु केली. ज्यानंतर पहिल्यांदाच विमान पुन्हा एअरपोर्टवर नेण्याची परिस्थिती उद्भवली आहे. या घटनेवेळी विमानात किती लोक होते हे अद्याप कळू शकलेले नाही. तसेच कंपनीकडूनही अद्याप कोणती माहिती आलेली नाही.

शनिवारी घडलेल्या घटनेची माहिती देताना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) अधिकाऱ्याने सांगितले की, DGCA या घटनेची चौकशी करत आहे. दरम्यान मुंबईहून बेंगळुरूला जाणारे अकासा एअरचे उड्डाण AKJ1103 चे संचालन विमान VT-YAE होते. दरम्यान या विमानाच्या केबिनमध्ये जळण्याचा वास आल्याने हे विमान अर्ध्या मार्गातून पुन्हा मागे मुंबई विमानतळावर आणण्यात आले.


उद्धव ठाकरेंना मत म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादीला मत; बावनकुळेंचा टोला