Nupur Sharma : टीव्ही वाहिनीवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांविरोधात मुंबई एफआयआर दाखल

another fir files against bjp spokesperson nupur sharma alleging controversial statement on prophet mohammad
भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांविरोधात आणखी एक FIR दाखल; मोहम्मद पैगंबरांविरोधात केले वादग्रस्त वक्तव्य

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या विरोधात मुंबईत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप रझा अकादमीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नुपूर शर्मा यांना मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत नुपूर शर्मा सहभागी झाल्या होत्या. या चर्चेदरम्यान नुपूर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधानं करण्यात आली. या वक्तव्यामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या असल्याचे रझा अकादमीने म्हटले आहे. त्यानंतर रझा अकादमीने मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी पायधुनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास सांगितले होते.

नुपूर शर्मा यांच्याविरोधात पायधुनी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून IPC 295A, 153A आणि 505B कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, नुपूर शर्मा याआधीही आपल्या ट्वीट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहिल्या आहेत.

एमआयएमने नुपूर शर्मा यांच्याविरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरोधात अटकेची मागणी केली आहे. नूपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध नॅशनल कॉन्फरन्सनेदेखील केला आहे. भाजप आणि केंद्र सरकराने आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सकडून करण्यात आली आहे.


हेही वाचा : Corona Virus Update : देशात २४ तासांत २ हजार २२८ नवे कोरोना रुग्ण, तर १४ जणांचा मृत्यू