Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE चिंताजनक! तीनपैकी एका कोरोनामुक्त रूग्णात दिसतायत 'ही' गंभीर लक्षणे

चिंताजनक! तीनपैकी एका कोरोनामुक्त रूग्णात दिसतायत ‘ही’ गंभीर लक्षणे

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. मात्र कोरोनामुक्त होण्याचे सर्वाधिक प्रमाण हे देखील महाराष्ट्रात आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुक्त झालेल्या तीन पैकी एक रुग्णाला सहा महिन्यानंतर मेंदूविकार (न्यूरॉलॉजिकल) आणि मानसिक समस्या निर्माण होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या मेंदूवर आणि आरोग्यावर नेमका कसा परिणाम होते. याचा अभ्यास एका सर्वेक्षणातून करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर लॅन्सेट सायकायट्री जर्नलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, कोरोनामुक्त झालेल्या २ लाख ३० हजाराहून अधिक लोकांच्या आरोग्याची नोंद घेण्यात आली. यातील ३४ टक्के लोकांना सहा महिन्यानंतर मेंदूविकाराशी निगडित न्यूरॉलॉजिकल आणि मानसिक समस्यांनी ग्रासले होते. तर १७ टक्के लोक चिंताग्रस्त आढळली तर १४ टक्के लोकांमध्ये मूड डिसऑर्डरची लक्षणे दिसली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य ही दोन लक्षणे प्रामुख्याने दिसली आहे. असे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. यात सर्वांमध्ये स्ट्रोक, स्मृतिभ्रंश, न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरसारखी लक्षणे आढळली, मात्र या लक्षणांचे प्रमाण कमी होते. परंतु तीनपैकी एका कोरोनामुक्त व्यक्तीमध्ये असे आजार उद्धवण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र मनोविकार आणि कोरोनाचा नेमका काय संबंध आहे याबाबतची माहिती यात स्पष्ट झालेली नाही.

- Advertisement -

एका मेंदूविकारतज्ज्ञांच्या माहितीनूसार, मुंबईतही कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या काही तक्रारी नोंद झाल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्याने मेंदूतील न्यूरो केमिकल्समध्ये बदल होतात. त्यामुळे मेंदुविकाराचा धोका अधिक वाढतो. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. काही ज्येष्ठ नागरिकांची प्रकृतीवर खालावते आणि त्यांच्या वागणुकीतही बदल दिसून येतात.


 

- Advertisement -