घरCORONA UPDATE२६/११ हल्ल्याचा कट रचलेल्या मोस्ट वाँटेड तहव्वूर हुसैन राणाला अमेरिकेत अटक

२६/११ हल्ल्याचा कट रचलेल्या मोस्ट वाँटेड तहव्वूर हुसैन राणाला अमेरिकेत अटक

Subscribe

भारत कित्येक वर्षापासून प्रत्यार्पणाची मागणी करत असलेल्या मोस्ट वाँडेट तहव्वूर हुसैन राणा याला अखेर अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राणाचे भारतात प्रत्यार्पण होण्याची अधिक शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. २००८ साली मुंबईकर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप तहव्वूर राणावर आहे. मूळचा पाकिस्तानी-कॅनडियन वंशाच्या तहव्वूर राणाला अमेरिकेने यापूर्वीही अटक केली होती. दोन दिवसांपूर्वीच शिक्षा भोगून बाहेर आलेल्या राणाला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून भारत राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. यावर ट्रम्प प्रशासनाने राणाचे प्रत्यापर्ण करण्यासाठी भारताला पूर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच प्रत्यार्पणासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. राणाला अमेरिकेत २०१३ मध्ये १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. डिसेंबर २०२१ मध्ये त्याची तुरुंगातून सुटका होणार होती. पण त्यापूर्वीच त्याला सोडण्यात आले होते.

तहव्वूर हुसैन राणाला मुंबईवरील हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी २००९ मध्ये अटक करण्यात आली होती. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात लश्कर-ए-तोयबाच्या १० अतिरेक्यांनी अमेरिकन नागरिकांसहीत १६६ निष्पाप नागरिकांना मारले होते. या हल्ल्यावेळी पोलिसांनी ९ अतिरेक्यांना ठार केले तर अजमल कसाब या एक दहशतवाद्याल जिवंत पकडण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयीन कार्यवाहीनंतर त्याला फाशी देण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

ठरलं! राजू शेट्टी ‘स्वाभिमानी’मधूनच विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -