घरताज्या घडामोडीनुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ, मुंब्रा पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याचे आदेश

नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ, मुंब्रा पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Subscribe

नुपूर शर्मा यांच्याविरोधातील रोष वाढत असून मुंबईतील पायधुनी, ठाण्यातील मुंब्रा आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत मुंब्रा पोलिसांनी समन्स बजावले आहे. तसेच, त्यांना २२ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुपूर शर्मा यांच्याविरोधातील रोष वाढत असून मुंबईतील पायधुनी, ठाण्यातील मुंब्रा आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. (Mumbra police summons suspended bjp spokesperson Nupur Sharma)

हेही वाचा – कोण आहेत नुपूर शर्मा? ज्यांच्या एका वक्तव्यामुळे आखाती देशांनी पुकारला भारताविरोधात एल्गार

- Advertisement -

नुपूर शर्मा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या चर्चा सत्रामध्ये पैगंबर मोहम्मद (prophet muhammad) यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद भारतासह आखाती देशांतही उमटू लागले. दरम्यान, भाजपवरील दबाव वाढल्याने नुपूर शर्मा यांना पदावरून हटवण्यात आले. तसेच, नुपूर शर्मा यांनीही आपले शब्द मागे घेत असल्याची कबुली दिली. याप्रकरणी मुंबईसह अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला असून नुपूर यांना समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना २२ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

हेही वाचा – वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपची नुपूर शर्मांवर कारवाई, पक्षातून केलं निलंबित

- Advertisement -

मुंबई, पुण्यासह विविध ठिकाणी गुन्हे दाखल

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मावर पुण्यातील कोंढवा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वादग्रस्त विधानाप्रकरणी नुपूर शर्माविरुद्ध मुंबई आणि हैदराबादमध्ये अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहे. रझा अकादमीच्या तक्रारीनंतर शर्मा यांच्याविरुद्ध IPCच्या कलम 153A, 5295A, 05B अंतर्गत मुंबईत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याचप्रमाणे हैदराबादमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून शर्मा यांच्याविरुद्ध सायबर क्राईम पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 505 (2), 506, 153 (ए), 504 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -