घरताज्या घडामोडी...आणि तीनहजार वर्षापूर्वींचा ममी कण्हायला लागला

…आणि तीनहजार वर्षापूर्वींचा ममी कण्हायला लागला

Subscribe

काही वर्षांपूर्वी जगभरात लोकप्रिय झालेला हॉलीवूड सिनेमा ‘ममी’ (Mummy) तुम्ही बघितलाच असेल. त्यातील चित्र विचित्र ममीज त्यांचे सांकेतिक भाषेतील बोलणेही तुमच्या लक्षात असेल. पण तुम्हांला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसेल की इजिप्तमधील एक ममीजही असाच सांकेतिक भाषेत आपल्या वेदना व्यक्त करू लागला आहे. इंग्लडमधील एका संग्रहालयात हा ममीज ठेवण्यात आला असून त्याचे कण्हणे ऐकूण वैज्ञानिकही चक्रावले आहेत. तीनहजार वर्षांपूर्वीचा ममीज कसा काय बोलू शकतो हे शोधून काढण्यासाठी त्याच्यावर संशोधन करण्यात येत आहे.

इजिप्तमध्ये हजारो वर्षांपूर्वी एखाद्या विशेष व्यक्तीचा मृतदेह जतन करून ठेवण्याची परंपरा होती. मृतदेहावर विशिष्ट प्रकारचा औषधी लेप लावण्यात यायचा. जेणेकरून मृतदेह सडणार नाही. त्यानंतर एका विशिष्ट झाडाच्या सालीत तो लपेटून ठेवला जायचा. त्याच्याजवळ संबंधित ममी असलेल्या व्यक्तीच्या आवडीच्या, व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्यांची हुबेहुब प्रतिकृती ठेवली जायची. त्याकाळी हे ममीज त्या प्रतिकृतींबरोबर संवाद साधायचे. बोलायचे. वेदना व्यक्त करायचे असे बोलले जात असे. पण कालांतराने ही चर्चा थांबली. पण आता इंग्लडमधील ‘लीड्स सिटी संग्रहालयात’ जतन करण्यात आलेला ‘नीसियामुन’ या इजिप्त गायकाचा ममी कण्हत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे कण्हणे वाढल्याने वैज्ञानिकांनी ममीजच्या गळ्याचे सीटी स्कॅन केले. पण त्यात काहीच न आढळल्याने वैज्ञानिकांनी हा आवाज स्पष्ट ऐकण्यासाठी त्याच्या गळ्यात कृत्रिम स्वरयंत्र बसवले. पण आश्चर्य म्हणजे स्वरयंत्र बसवल्यावरही अगदी तसाच आवाज येत आहे. हा आवाज आजाराने किंवा वेदनेने कण्हणाऱ्या व्यक्तीसारखा आहे. हा आवाज रेकॉर्ड करण्यात आला आहे. यामुळे नीसियामुनला वेदना होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

- Advertisement -

नीसियामुनचा ममी ज्या कबरीत ठेवलेला आहे त्यावर तीनहजार वर्षांपूर्वीच्या सांकेतिक भाषेत त्याचा परिचय देण्यात आलेला आहे. त्यात नीसियामुन हा इजिप्तचा राजा फॅरो रामरोस-११ यांच्या दरबारातील पुजारी व पत्रकार होता. तो राजासाठी गुप्त माहिती गोळा करण्याचे काम करायचा. त्याबरोबरच तो दरबारात धार्मिक गाणीही म्हणायचा. तो इजिप्तचा आवाज होता. असे कबरीवर लिहून त्याचा गौरव करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -