धक्कादायक! कैद्याने गुप्तांग कापून शिवलिंगावर केलं अर्पण!

मध्य प्रदेश मधील ग्वालियर मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी ही खळबळजनक घटना घडली आहे. सध्या या कैद्याची प्रकृती स्थिर आहे.

Murder convict severs his penis in Gwalior jail, offers it to shivlinga
धक्कादायक! कैद्याने गुप्तांग कापून शिवलिंगावर केलं अर्पण!

एकीकडे कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा वाढत असल्यामुळे भीतीच्या वातावरणात भर पडत आहे. तर दुसरीकडे खळबळजनक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. मध्य प्रदेशातील ग्‍वालियर येथील मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी एका कैद्याने आपलं गुप्तांग कापून तुरुंगातील आवारात असलेल्या शिवलिंगाला अर्पण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. या कैद्याला तातडीने शहरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या कैद्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिस या घटनेमागील खऱ्या कारणांचा शोध घेत आहे.

ग्‍वालियर मध्यवर्ती कारागृह अधीक्षक मनोज साहू यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं की, मंगळवारी सकाळी ६.३० वाजता विष्णू सिंह या कैद्याचे रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्याला तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २०१८ पासून हत्या केल्या प्रकरणी हा कैदी ग्‍वालियर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तो मुळचा मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील उमरी गावचा रहिवासी आहे. या कैद्याने गुप्तांग कापण्यासाठी धारदार चमचाचा वापर केला, असल्याचं जेल अधिकाऱ्याने सांगितलं.

कैद्याने अधिकाऱ्यांना सांगितलं की, सोमवारी रात्री शिवाने आपलं गुप्तांग कापून अर्पण करणाऱ्यास स्वप्नात सांगितलं. त्यानंतर त्याने हे पाऊल उचललं. मध्य प्रदेशातील तुरुंगात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात येत आहे. कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास मनाई केली आहे.


हेही वाचा – CoronaVirus: सौदी अरेबियाच्या ‘या’ निर्णयामुळे लाखो भारतीय येणार अडचणीत